दहिसर: वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 28 जणांना विषबाधा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील दहिसर येथे वाढदिवसाचे केके खाल्ल्याने एकाच वेळी 28 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर विषबाधा झालेल्यांना नजीकच्या रुग्णलयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्यांपासून लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. मात्र ही विषबाधा नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास केला जात आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अर्जुन सिंग यांच्या घरी त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर वाढदिवसानिमित्त आलेल्या पाहुण्यांना केक देण्यात आला. मात्र पाहुण्यांना काही वेळानंतर पोटात दुखण्यासोबत उलट्या होण्यास सुरुवा झाली. तर काहींना जुलाब होण्याचा त्रास सुद्धा झाला. या प्रकारामुळे पाहुण्यांना विषबाधा झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तर केक खाल्लेल्या सर्व जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. यामध्ये 11 महिला, 7 पुरुष मंडळी आणि अन्य बालकांचा समावेश असून अनेकांना अशक्तपणा आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर ज्या दुकानामधून केक खरेदी केला होता त्याला टाळे लावले आहे. तसेच त्याच्या दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने घेत अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.(पुणे: रामभाऊ म्हाळगी शाळेत 22 विद्यार्थी आणि शिक्षकाला मध्याह्न भोजनातून विषबाधा)

तर दोन दिवसांपूर्वीच अहमदनगर येथील एका कुटुंबाला अन्नातून विषबाधा  झाली असून, या कुटुंबातील लहान बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर पीडित परिवार हे  मोलमजूरी करुन आपला चरितार्थ चालवतात. हातावरचे पोट असल्याने घरची परिस्थितीही साधारणच आहे. त्यामुळे सातत्याने आर्थिक दडपणाखाली असलेल्या कुटुंबावर या घटनेने घाला घातला आहे.