'Blood' In Burger King Meal: बर्गर किंग हे फूड चेनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. ही एक आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन आहे, जी जगातील जवळजवळ प्रत्येक देशात आहे. आता बर्गर किंगबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका महिलेने बर्गर किंगमधून जेवण ऑर्डर केले होते, मात्र या तिच्या पार्सलमध्ये तिला चक्क आढळून आले. अहवालानुसार, न्यूयॉर्कमधील या महिलेने स्वतःसाठी आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीसाठी बर्गर ऑर्डर केला होता. मात्र हा बर्गर रक्ताने माखलेला असल्याचा दावा तिने केला आहे. शुक्रवारी TikTok वर याचा व्हिडिओ शेअर करताना महिलेने सांगितले की, तिच्या मुलीच्या हॅम्बर्गरवर रक्त आढळून आले. त्यानंतर तिने ताबडतोब बर्गर किंगला फोन केला आणि तिथल्या मॅनेजर डॅनने तिला सांगितले की, इथल्या एका कुकचा हात कापला आहे व ते रक्त कदाचित हेच असावे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बर्गर किंगच्या कॉर्पोरेट कार्यालयाने महिलेला कोणत्याही वैद्यकीय खर्चासाठी पैसे देण्याची ऑफर दिली. कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी आणि सखोल साफसफाईच्या प्रक्रियेचे पालन करण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंट तात्पुरते बंद केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा; Amravati Video : भाजी विक्रेत्याने धुतली घाणेरड्या पाण्यात भाजी, अमरावती येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
पहा पोस्ट-
A #Sanborn mother witnessed something she never could imagine: finding blood on her order. It was found on her daughter's Burger King bag that was almost consumed by the 4yo. She now has to wait 30 days to get blood tested. #Getzville #WNY @WKBW @ECDOH https://t.co/xlFIXu9vB0 pic.twitter.com/ywaF9IuHwa
— Pheben Kassahun WKBW (@PhebenKassahun) July 30, 2024
Burger King meal splattered with blood served to 4-year-old, New York mom says https://t.co/UbTdomMMmQ
— 8 News Now (@8NewsNow) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)