महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास जोरात सुरु आहे. सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी भगवंत सिंग याला बेलापूर येथून अटक केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे. त्याने नेमबाजांना राहण्याची जागा आणि शस्त्रे पुरवली होती. तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता. या हत्येप्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशात बाबा सिद्दिकी त्यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकी याने सोशल मीडिया पोस्टमध्ये मारेकऱ्यांना आव्हान दिले.

आपल्या पोस्टमध्ये झीशान म्हणतो, ‘त्यांनी माझ्या वडिलांना गप्प केले. पण विसरू नका, ते सिंह होते आणि त्यांची गर्जना माझ्या नसात वाहत आहे. ते न्यायासाठी उभे राहिले, परिवर्तनासाठी लढले आणि संकटांचा अतूट धैर्याने सामना केला. आता, ज्यांनी त्यांना मृत्युमुखी पाडले त्यांची नजर माझ्यावर आहे. आपण जिंकलो असे ते समाजात आहेत. आता मी त्यांना सांगतो, सिंहाचे रक्त माझ्या नसांमध्ये धावत आहे. मी अजूनही इथेच आहे, निर्भय आणि अखंड आहे. माझ्या वडिलांची जागा आता मी घेतली आहे. ही लढाई संपली नाही. आजही, ते जिथे उभे होते तिथेच मी जिवंत आणि तयार उभा आहे.’ (हेही वाचा: Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दहाव्या संशयिताला अटक)

झीशान सिद्दीकीने वडिलांच्या मारेकऱ्यांना आव्हान-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)