Cockroach Found in Meal on Train: आजकाल बाहेरचे खाणे जीवघेणे ठरत आहे. बाहेरच्या जेवणामध्ये सडलेले प्राणी, अनेक वस्तू इतकेच नाही तर अगदी तुटलेले मानवी बोट सापडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आता देशातील प्रिमियम ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात मृत झुरळ सापडले आहे. विदित वार्शने नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने प्रीमियम वंदे भारत ट्रेनमध्ये खराब अन्न मिळत असल्याची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये मृत झुरळे दिसत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे.

ही ट्रेन भोपाळहून आग्राकडे येत होती. विदितने दावा केला की, त्याचे काका आणि काकू वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत होते. वंदे भारतमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेले झुरळ आढळले. विदितने सांगितले की, ही घटना 18 जून 2024 रोजी घडली. त्यानंतर दोन दिवसांनी, आयआरसीटीसीने याबाबत माफी मागितली आणि म्हटले की, संबंधित सेवा प्रदात्यावर ‘योग्य दंड’ आकारण्यात आला आहे. आयआरसीटीसीने म्हटले की, ‘तुमच्या प्रवासाच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित सेवा प्रदात्यावर योग्य तो दंड ठोठावण्यात आला आहे. आम्ही उत्पादन आणि लॉजिस्टिक निरीक्षण देखील तीव्र केले आहे.’ (हेही वाचा: Frog Found In Wafer Packet: वेफरच्या पाकिटात आढळला सडलेला बेडूक; गुजरातच्या जामनगरमधील धक्कादायक घटना)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)