Frog Found In Wafer Packet: नुकतेच मुंबईतील एका रहिवाशाने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. त्यानंतर झेप्टोवरून ऑर्डर केलेल्या चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर आढळून आला. ही दोन्ही प्रकरणे अद्याप थंडावली नव्हती, तर आता गुजरातमधील जामनगरमध्ये अशीच एक बातमी समोर आली आहे. येथे बालाजी वेफर्सच्या बटाटा चिप्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळून आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच जामनगर महापालिकेने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाबाबत जामनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणीचा भाग म्हणून बटाटा चिप्स पॅकेटच्या उत्पादन बॅचचे नमुने गोळा केले जातील. अन्न सुरक्षा अधिकारी डीबी परमार यांनी पत्रकारांना सांगितले की, जास्मिन पटेल नावाच्या एका तरुणीने त्यांना बालाजी वेफर्सच्या क्रंचेक्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी,  काल रात्री ते पॅकेट ज्या दुकानातून खरेदी केले होते त्या दुकानात गेले. सुरुवातीच्या तपासात तो मृत बेडूक असल्याचे समोर आले असून, तो कुजलेल्या अवस्थेत होता. आता महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार या बटाटा चिप्स पॅकेटच्या या बॅचचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. (हेही वाचा: Dead Rat Found In Hershey's Chocolate Syrup: झेप्टोवरून ऑर्डर केलेल्या चॉकलेट सिरपमध्ये सापडला मृत उंदीर; पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)