Dead Rat Found In Hershey's Chocolate Syrup (PC - Instagram)

Dead Rat Found In Hershey's Chocolate Syrup: झेप्टोद्वारे (Zepto) ऑर्डर केलेल्या हर्शीच्या चॉकलेट सिरप (Hershey's Chocolate Syrup) च्या बाटलीमध्ये चक्क मेलेला उंदीर (Dead Rat) सापडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्स आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, तिच्या कुटुंबाने ब्राउनी केकसाठी Zepto ॲप वापरून सिरप खरेदी केले. इंस्टाग्राम वापरकर्ता प्रमी श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी दूषित सिरपचे सेवन केले आणि त्यांच्यापैकी एकाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती.

हर्षे चॉकलेट सिरपची बाटली डिस्पोजेबल कपमध्ये रिकामी केल्यावर चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर पडल्याचा भयानक प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. तो मृत उंदीर असल्याची खात्री करण्यासाठी, त्यांनी त्याला वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे धुवून काढले. संबंधित व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिलेनुसार, तिने तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण कंपनीकडून उत्तर मिळाले नाही. उंदीर सापडण्यापूर्वी घरातील तीन जणांनी सिरपचे सेवन केले. त्यापैकी दोघांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, परंतु एक मुलगी बेशुद्ध झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. (हेही वाचा -Cobra in Amazon Package: बंगळुरु येथील जोडप्यास ॲमेझॉन डिलीव्हरी पॅकेजमध्ये आढळला कोब्रा (Watch Video))

प्रमी श्रीधर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'हे अत्यंत चिंताजनक आणि अस्वीकार्य आहे. आम्ही आरोग्याच्या जोखमीबद्दल आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या अभावाबद्दल चिंतित आहोत.' तथापी, श्रीधर यांनी त्यांच्या फॉलोवर्संना मुलांना दिल्या जाणाऱ्या सिरप तसेच इतर पदार्थांची दुहेरी तपासणी करण्याचा आणि पॅकेज केलेले अन्न हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा - Dead Snake Served In Meal At Govt College: इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनच्या जेवणात सापडला मृत साप; अनेक विद्यार्थी पडले आजारी (See Photos))

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prami Sridhar (@pramisridhar)

दरम्यान, महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी सुरुवातीला या प्रकरणाची कंपनीकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, हर्षे कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा व्हिडिओ 29 मे रोजी शेअर करण्यात आला होता आणि तेव्हापासून व्हिडिओला 5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हर्षे कंपनीने श्रीधर यांच्या पोस्टवर कमेंट केली असून म्हटलं आहे की, हाय, हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. कृपया आम्हाला UPC आणि मॅन्युफॅक्चरिंग कोड बाटलीमधून consumercare@hersheys.com वर संदर्भ क्रमांक 11082163 पाठवा जेणेकरून आमचा एक सदस्य तुम्हाला मदत करू शकेल.