Cobra in Amazon Package: बंगळुरु येथील जोडप्यास ॲमेझॉन डिलीव्हरी पॅकेजमध्ये आढळला कोब्रा (Watch Video)
Cobra in Amazon Package | (Photo Credit - X)

बंगळुरू येथील एका जोडप्याला (Bengaluru Couple) ॲमेझॉन पॅकेजमध्ये जिवंत कोब्रा सापडला (Cobra In Amazon Package) . सॉफ्टवेअर अभियंते असलेल्या या जोडप्याने नवीन Xbox कंट्रोलरची ऑर्डर दिली होती. धक्कादायक म्हणजे त्यांची ऑर्डर (Amazon Order) आली खरी. पण बॉक्सच्या आत त्यांना एक कोब्रा आढळून आला. ज्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. यात एक सकारात्मक बाब अशी की, बॉक्समध्ये असलेला कोब्रा साप पॅकेजिंग टेपला अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नव्हते. जोडप्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर शेअर केला आहे. जो आता व्हायरल (Viral Video) झाला आहे.

पॅकेजींग टेपला चिकटला साप

या जोडप्याने या घटनेचा व्हिडिओ कॅप्चर केला असून त्यात साप टेपमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी ताबडतोब ॲमेझॉनच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधला. त्यांनी अमेझॉनकडे केवळ त्यांच्या ऑर्डरचे निराकरण करण्यासाठी संपर्क साधला नाही तर, त्यांनी धोकादायक परिस्थितीची तक्रार देखील केली. खरेदीदाराने त्यांचा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आणि सांगितले की, “आम्ही Amazon वरून 2 दिवसांपूर्वी Xbox कंट्रोलरची ऑर्डर दिली आणि पॅकेजमध्ये एक जिवंत साप मिळाला. डिलिव्हरी पार्टनरद्वारे पॅकेज थेट आमच्याकडे सुपूर्द केले गेले (बाहेर सोडले नाही). आम्ही सर्जापूर रोडवर राहतो आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. तसेच आमच्याकडे याचे प्रत्यक्षदर्शीही आहेत. सुदैवाने, तो (साप) पॅकेजिंग टेपला चिकटला होता आणि आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील कोणालाही हानी पोहोचली नाही.” सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Snake Viral Video: मलेशियाहून चेन्नईला आलेल्या महिलेच्या बॅगेत आढळले 22 जिवंत साप; विमानतळ अधिकारीही थक्क (Watch))

ग्राहकाकडून Amazon कंपनीकडे तक्रार

या जोडप्याने पुढे नोंदवले की Amazon च्या ग्राहक तक्रार निवारण विभागाने त्यांना दोन तासांहून अधिक काळ होल्डवर ठेवले आणि त्यांना मध्यरात्रीच्या वेळी एकट्याने परिस्थिती हाताळण्यास भाग पाडले. "धोका असूनही, Amazon च्या ग्राहक तक्रार निवारण विभागाने आम्हाला 2 तासांहून अधिक काळ रोखून ठेवले. मध्यरात्री (पुन्हा पुरावा व्हिडिओ आणि फोटोंमध्ये कॅप्चर केलेला) आम्हाला स्वतःहून परिस्थिती हाताळण्यास भाग पाडले," खरेदीदाराने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, No Water-Bathroom Breaks: 'विश्रांती न घेता सतत काम करण्यास भाग पाडले, लघवी करण्यासाठी दिल्या प्लास्टिकच्या बाटल्या'; Amazon India वर कामगारांचे गंभीर आरोप)

व्हिडिओ

कंपनीकडून माफीची औपचारिक प्रक्रिया

Amazon ने ट्विटला केवळ सामान्य माफी मागून औपारिक प्रक्रिया पार पाडत प्रतिसाद दिला. कंपनीने म्हटले की, “Amazon ऑर्डरमुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही घटनेची नोंद घेतली असून हा प्रकार घडलाच कसा याबाबत तपास करत आहोत. कृपया आपला तपशील योग्य ठिकाणी सामायिक करा. आम्ही आपल्या संपर्कात आहोत. शिवाय कंपनीने आपला झालेला खर्चही परत केला आहे.