Ahmedabad Plane Crash दुर्घटनेनंतर भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (See Post)
12 जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडिया फ्लाइट एआय 171 क्रॅश झाल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी बेकनहॅममध्ये संघाच्या अंतर्गत सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनी काळ्या हातावर पट्ट्या बांधल्याचे दिसून आले.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 12 जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर 13 जून रोजी बेकनहॅममध्ये संघाच्या अंतर्गत सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतल्याचे दिसून आले. सामन्यापूर्वी त्यांनी एक मिनिट शांतता पाळली. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 171 अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. विमानात क्रू मेंबर्ससह 266 प्रवासी होते. या दुर्दैवी घटनेत अपघातात फक्त एकच जण वाचला. तर सर्व 265 प्रवासी मृत्युमुखी पडले. दरम्यान, 20 जूनपासून भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे.
Team India observing a minute's silence to pay homage to the victims of the Ahmedabad plane crash. pic.twitter.com/B2p5WEL2l0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

