Shoko Miyata Out of Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक येत्या 26 जुलैपासून सुरु होणाह आहे. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणे खुप कठीण असले तरी, खेळाडून केलेली कोणतीही चूक हे त्यांच्या कमावलेले स्थान रद्द करण्यास कारणीभूत ठरू शकते. अश्यात एक घटना समोर आली आहे. घटनेमुळे शोको मियाताला जपानच्या जिम्नॅस्टिक संघात स्थान मिळावे लागले. उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या संघाचे नेतृत्व करताना त्याने धूम्रपान करून संघाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. जेजीए( जपानी जिम्नॅस्टिक्स असोशिएशन ) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मियाता चाचणीसाठी मोनाकोमधील संघाच्या प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडल्यानंतर गुरुवारी जपानमध्ये आली.धुम्रपान करून नियमांचे उल्लघंन केले. जेजीएने जारी केलेल्या पुढील निवेदनानुसार महिला संघ पाच ऐवजी चार खेळाडूंसोबत स्पर्धा करेल. मियाताने 2022 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. (हेही वाचा-  सगळ संपलं! हार्दिक पांड्याला एकाच दिवसात दोन धक्के, आधी कर्णधारपदावरुन हक्कलपट्टी आता चार वर्षांचा संसार मोडला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)