Viral Video: इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर एक माथेफिरू महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, महिला  धोकादायक आणि बेजबाबदार वर्तन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या अशाच एका व्हिडीओमध्ये एक महिला एका पुरुषाच्या कारला केवळ सिगारेट देण्यास नकार दिल्याने आग लावताना दिसत आहे. @PicturesFoIder या X खात्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पेट्रोल पंपावरचा एका भयानक घटनेचा 15-सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये महिला एका पुरुषाजवळ जाताना दिसत आहे, जो त्याच्या कारमध्ये पेट्रोल भरत आहे. नंतर महिला त्या पुरुषाला सिगरेट मागते पण तो व्यक्ती नकार देतो. दरम्यान, चिडलेली महिला आग लावून घटनास्थळावरून निघून जाते. आग लागल्यावर माणूस त्वरीत गॅसोलीन नोजल काढून टाकतो त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळते. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही दुखापत झाली नाही. व्हिडीओ कुठलचा आहे ते अद्याप समोर आलेले नाही.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)