Sleep Deprivation: जर तुमचीही झोप कमी होत असेल तर व्हा सावध! स्मरणशक्तीसोबतच मेंदूवरही होऊ शकतो विपरीत परिणाम, जाणून घ्या काय सांगतो AIIMS चा अभ्यास
रात्रीची शांत झोप photo credits: PIxabay

आजकाल अनेकांना शांत झोप (Sleep) लागत नाही. अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांची झोप मोडते किंवा झोपेत कसलातरी अडथळा निर्माण होतो. घोरण्यासोबतच झोपताना श्वास घेण्यासही त्रास होतो. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर सावध व्हा. अपुरी झोप घेतल्याने तुमची स्मरणशक्ती आणि मेंदूच्या इतर कार्यांवर परिणाम होतो. एम्सच्या (AIIMS) एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) आणि झोपेची खराब गुणवत्ता ही लक्षणे मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतात.

हा नवीन अभ्यास 6,795 लोकांवर करण्यात आला. अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांना झोपेच्या समस्या म्हणजेच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आहे त्यांची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि मेंदूच्या सामान्य कार्यावर विपरित परिणाम होतो. या अभ्यासातील 49% स्त्रिया 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या होत्या. (हेही वाचा: Bidi is More Dangerous than Cigarette: सिगारेटपेक्षा 8 पट जास्त घातक आहे बिडी; तज्ज्ञांनी दिली माहिती, जाणून घ्या सविस्तर)

अभ्यासात पुढे असे दिसून आले आहे की, झोपेच्या समस्या 50 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांच्या मेंदूवर अधिक परिणाम करतात, परंतु वृद्ध लोकांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. ज्या लोकांची पूर्ण झोप होत नाही त्यांची विचार करण्याची क्षमता कमकुवत असल्याचे दिसून आले. याचा अर्थ, योजना आखण्याची, गोष्टींची रचना करण्याची, समस्या समजून घेण्याची आणि सोडवण्याची त्यांची क्षमता प्रभावित होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये स्मृतिभ्रंश (स्मरणशक्ती कमकुवत होणे) टाळण्यासाठी या अभ्यासाचे परिणाम खूप महत्त्वाचे आहेत.

निद्रानाश आणि खराब झोप ही दोन्ही लक्षणे बदलली जाऊ शकतात. अभ्यासाअंती असे म्हटले आहे की, जर लोकांना झोपेच्या समस्येची लक्षणे आणि त्याचे वाईट परिणाम याबद्दल माहिती नसेल तर त्यांना वेळीच योग्य उपचार मिळू शकणार नाहीत. मात्र याबाबतच्या उपचारांमुळे लोकांचा मेंदू कमकुवत होण्यापासून काही प्रमाणात वाचवला जूस हाकतो. याबाबत एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक आणि फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे सध्याचे प्रमुख, मुख्य संशोधक डॉ.कामेश्वर प्रसाद सांगतात की, ज्या लोकांची झोप कमी आहे किंवा जे निद्रानाशची लक्षणे अनुभवत आहेत त्यांनी त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि मेंदूच्या इतर कार्यांवर कोणतेही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी उपचार घ्यावेत.