Porn Videos: कमी होत आहे तरुण पुरुषांमधील Testosterone ची पातळी; सतत पॉर्न व्हिडीओ पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे पडू शकते महागात
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

सध्या तरुण पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची (Testosterone) पातळी कमी होत आहे आणि यासाठी सतत अश्लील व्हिडीओ (Porn Video) पाहणे हे एक महत्वाचे कारण असू शकते. टेस्टोस्टेरॉन हे शरीरातील एक महत्वाचे हार्मोन आहे, जे लैंगिक अवयव, स्नायू, लाल रक्तपेशी, हाडांची घनता आणि बऱ्याच गोष्टी योग्य स्थितीत राखण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी मदत करते, परंतु आता काही पुरुषांमध्ये या हार्मोनचा पुरवठा कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, कमी टेस्टोस्टेरॉनचा परिणाम सुमारे 2% पुरुषांवर होतो. ज्यामध्ये नैराश्य, केस गळणे आणि कामवासना कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. द सनच्या मते,  तरुण पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत आहे आणि यासाठी जास्त प्रमाणात पॉर्न पाहणे किंवा गेमिंग ही कारणे असू शकतात.

याआधी 2017 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे पुरुष जास्त प्रमाणात व्हिडिओ गेम खेळतात त्यांची कामवासना ही व्हिडीओ गेम न खेळणाऱ्या पुरुषांपेक्षा बरीच कमी होती. संशोधकांच्या मते व्हिडिओ गेममध्ये व्यस्त राहण्याने डोपामाइन उत्सर्जित होते आणि हे ‘आनंद संप्रेरक’ सेक्सदरम्यान सोडले जाते. यामुळे तुमचे शारीरिक संबंधामधील स्वारस्य बऱ्याच अंशी कमी होते.

द सनच्या मते, व्हिडिओ गेम खेळणे आनंददायी आहे परंतु ते तणावपूर्ण देखील आहे, यामुळे संभाव्यतः प्रोलॅक्टिन हार्मोनमध्ये वाढ होते आणि टेस्टोस्टेरॉन कमी होते, पुरुषांमध्ये प्रोलॅक्टिनचे प्रमाण जास्त असल्याने नपुंसकत्व येऊ शकते. त्याचप्रमाणे, सतत पोर्नोग्राफी पाहण्याची सवयही सेक्स ड्राइव्ह कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. पोर्नोग्राफी आणि व्हिडिओ गेमिंगमुळे झोपेचे चक्र बिघडू शकते व यामुळेही टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. (हेही वाचा: Extramarital Affairs: हमे कोई गम नही! विवाहित लोकांना जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पश्चात्ताप होत नाही; अभ्यासात धक्कादायक खुलासा)

दरम्यान, याआधी 2016 च्या एका अभ्यासात असे आढळून आले होते की, खूप जास्त प्रमाणात पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते. काही तज्ञांच्या मते अश्लील व्हिडीओ हे टेस्टोस्टेरॉनची पातळीच कमी करत नाहीत, तर सेक्सची इच्छाही कमी करतात. तुमचा आहारदेखील टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर परिणाम करू शकतो. ब्रेड, पेस्ट्री, डेअरी आणि मिष्टान्न यांच्या सेवनामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. यासाठी व्यायाम, वेटलिफ्टिंग, व्हिटॅमिन डीचे सेवन वाढवणे, अल्कोहोल टाळणे आणि चरबी, प्रथिने आणि कर्बोदकांचा संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.