H3N2 Virus Symptoms: कोविड सारखी लक्षणे असलेला इन्फ्लूएन्झा भारतभर वाढत आहे. या व्हायरमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नुसार, अनेकांना श्वसनाचा त्रास देणारा रोग म्हणजे इन्फ्लूएंझा A उपप्रकार H3N2 ची लागण झाली आहे. वायुप्रदूषण असलेल्या लोकांना श्वसनमार्गाच्या संसर्गासह ताप येतो.
ICMR शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, H3N2 गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. इतर उपप्रकारांच्या तुलनेत, यामुळे प्रभावित अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांनी व्हायरसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लोकांसाठी काय करावे आणि करू नये याची यादी देखील जारी केली आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील देशभरात खोकला, सर्दी आणि मळमळण्याच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्सच्या अंदाधुंद वापराविरूद्ध एक सल्ला जारी केला आहे. (हेही वाचा - Covid-19 Long-Term Effects: कोविडनंतर तरुण आणि फिट लोकांमधील हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये 20% वाढ, पहा धक्कादायक अहवाल)
H3N2 व्हायरसची लक्षणं -
- खोकला
- मळमळ
- उलट्या
- घसा खवखवणे
- शरीर वेदना
- अतिसार
H3N2 व्हायरसच्या संसर्गपासून वाचवण्यासाठी उपाय -
आपले हात नियमितपणे पाण्याने आणि साबणाने धुवा. तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, फेस मास्क घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका. हायड्रेटेड रहा आणि भरपूर द्रव प्या. ताप आणि अंगदुखीचा त्रास होत असल्यास पॅरासिटामॉल घ्या.
आयएमएने डॉक्टरांना आवाहन केले आहे की, संसर्ग जिवाणू आहे की नाही याची पुष्टी करण्यापूर्वी रुग्णांना प्रतिजैविक लिहून देऊ नका. कारण ताप, खोकला, घसा खवखवणे आणि शरीरदुखीची सध्याची बहुतेक प्रकरणे ही इन्फ्लूएंझाची प्रकरणे आहेत. ज्यांना प्रतिजैविकांची आवश्यकता नसते.