Coronavirus | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये मागील दीड वर्षांपासून कोरोना वायरसचा (Coronavirus) धुमाकूळ सुरू आहे. या काळामध्ये त्यामध्ये काही बदल झाले. नवे म्युटंट आपल्याला समजले. कोरोनाने जसं रूप बदललं तसे तशी त्याची लक्षणं बदलली. या सार्‍याला समजून घेत अनेकांनी कोविड वर मात देखील केली. पण आता पोस्ट रिकव्हरी देखील या आजारातून अनेक समस्या शरीरात जाणवत असल्याचं लक्षात आले आहे. यापैकीच एक Mucormycosis. भारतात अनेक रूग्णांमध्ये पोस्ट रिकव्हरी Mucormycosis हा दुर्मिळ आणि तितकाच गंभीर आजार जडत असल्याचं समोर आलं आहे. नेमका हा आजार काय आहे? कोणाला होऊ शकतो? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावरही मात करणं शक्य आहे का? जीवघेणा आजार किती आहे? अशा तुमच्या मनात आलेल्या या सार्‍यांची इथे माहिती नक्की पहा.

Mucormycosis आजार नेमका काय आहे?

Mucormycosis हा आजार zygomycosis म्हणून देखील ओळखला जातो. हे एक गंभीर फंगल इंफेक्शन आहे. mucormycetes या बुरशीमुळे तो जडतो. हा आजार अशा व्यक्तींना जडण्याची शक्यता आहे ज्यांची औषधं किंवा आजारपणं ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी असतात. सामान्यपणे हे बुरशीजन्य इंफेक्शन सायनस, मेंदू, फुफ्फुसं मध्ये जडू शकतो त्यामुळे कोविड 19 च्या रूग्णांमध्ये या आजाराचा धोका वाढत आहे.

धोका कोणाला आहे?

SARs-COV-2 virus हा कोरोना वायरस रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करत असतो. त्यामुळे कोविड 19 रूग्णांमध्ये जे या आजाराचा सामना करण्यासाठी स्टिरॉईड्स घेत असतात. तसेच मधुमेही रूग्ण आणि रोग प्रतिकारशक्ती कमी असलेले रूग्ण यांना Mucormycosis चा धोका अधिक आहे.

Mucormycosis ची लक्षणं काय?

Mucormycosis हा प्रामुख्याने नाक, सायनस, मेंदू आणि डोळे या भागाजवळ आढळू शकतो. त्यामुळे कोरोना रूग्णांनी खालील काही विशिष्ट लक्षाणांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.

चेहर्‍यावर सूज,

वेदना आणि त्या भागातील संवेदना जाणं

नाकातून विनाकारण रक्त किंवा काळसर द्रव बाहेर पडणं

डोळ्यांवर सूज

नाकात, सायनस मध्ये कंजेशन

(नक्की वाचा: Mucormycosis: कोरोना व्हायरस सोबतच आता 'म्यूकोर्मिकोसिस' नावाच्या संसर्गयुक्त आजाराचा धोका; अहमदाबादमध्ये तब्बल 9 जणांचा मृत्यू).

Mucormycosis ची लक्षणं जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. Antifungal औषधांनी त्यावर उपचार केले जाऊ शकतात. ही आयवी किंवा तोंडाद्वारा दिली जाऊ शकतात. जर हा त्रास खूपच गंभीर असेल तर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. यामध्ये मृत टिश्यू काढून टाकले जातात.