Influenza Illness Measures and Precautions: इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल? आरोग्य विभागाने दिली प्राथमिक माहिती
Influenza | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

राज्यात इन्फ्लूएंझा (Influenza) आजाराचे रुग्ण पाठिमागील काही काळापासून वाढत आहेत. अशा वेळी इन्फयूएंझा टाळण्यासाठी नेमकी कोणती उपायात्मक खबरदारी (Influenza Illness Measures and Precautions) घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी सरकारचा आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागातील अभ्यासक काय तज्त्र काय सांगतात हे ऐकणे प्रभवी ठरते. खरे तर इन्फ्लूएंझा, सामान्यत: फ्लू (Influenza flu) म्हणून ओळखला जातो. जो इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा एक संसर्गजन्य श्वसन आजार आहे. फ्लूमुळे सौम्य ते गंभीर आजार होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तो जीवघेणा देखील ठरु शकतो. विशेषत: असुरक्षित व्यक्तींसाठी. जसे की लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक. फ्लूपासून संपूर्ण संरक्षणाची हमी देणे काहीसे अशक्य आहे. परंतू, आजारी पडण्याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. इन्फ्लूएन्झा होऊ नये म्हणून तुम्ही घेऊ शकता असे काही प्रतिबंधात्मक उपाय आम्ही येथे सूचवत आहोत.

इन्फ्लूएन्झा दूर ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय

लसीकरण करा: फ्लूपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वार्षिक फ्लू लसीकरण करणे.

चांगल्या स्वच्छतेची सवय लावा: आपले हात वारंवार धुणे. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकणे. आपल्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळणे. खोकला, सर्दी अथवा श्वसनाशी संबंधीत कोणताही त्रास असेल तर सर्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अशा काही सवयी फ्लूचा प्रसार कमी करण्यास मदत करू शकतात. (हेही वाच, Coronavirus: भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, देशभरात 796 संक्रमितांची नोंद; केंद्राने महाराष्ट्रासह 6 राज्यांना पत्र धाडून खबरदारीच्या सूचना)

आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा: फ्लू सारखी लक्षणे असलेल्या आजारी लोकांपासून दूर राहणे व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा: निरोगी जीवनशैली राखल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळू शकते आणि फ्लूचा धोका कमी होतो.

परिसर स्वच्छ ठेवा: वारंवार स्पर्श केलेल्या वस्तू आणि पृष्ठभाग निर्जंतुक केल्याने फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोखता येतो. तसेच, तुमचा वावर असलेली ठिकाणे, जसे की, घर, खोली, आंगण, आवार, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी स्वच्छता ठेवा.

ट्विट

वर दिलेले प्रतिबंधात्मक उपाय करून, तुम्ही स्वतःला आणि इतरांना फ्लू होण्यापासून वाचविण्यात मदत करू शकता. लक्षात ठेवा की उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो, त्यामुळे फ्लूच्या हंगामात आजारी पडू नये यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे आहे.