Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशभरात 796 कोरोना (Covid-19) संक्रमितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात शुक्रवारी (17 मार्च) दिली आहे. या संख्येसोबतच देशभरातील सक्रिय रुग्णांचा आकडाही 5,000 च्या पुढे गेला आहे. पाठिमागील सलग 109 दिवसांमधील रुग्णसंख्येत झालेली ही सर्वोच्च नोंद असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्रासह राज्यांना पत्र धाडून खबरदारीच्या सूचानाही दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना पत्र लिहीले आहे.

दरम्यान, देशभरातील आतापर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या 4.46 कोटी इतकी झाली आहे. यात नजिकच्या पाच मृतांसह मृत्यू झालेल्यांची संख्या 5,30,795 इतकी झाली आहे. ही आकडेवारी सरकारने सकाळी (17 मार्च) 8 वाजेपर्यंत अद्ययावत केलेल्या आणि दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. नजिकच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. (हेही वाचा, COVID-19: चीनच्या वुहान मार्केटमधील रॅकून कुत्र्यांपासून कोविड महामारीची सुरुवात, तज्ञांचा दावा)

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यांनी वाढती कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा. राज्यात चाचणी, रुग्णांचा शोध, यासिवाय लसीरकरण, नव्या रुग्णांची लक्षणे, इन्फ्यूएन्झा आणि सारी आजाराच्या रुग्णांवर नजर ठेवणे आदी तत्वांचे पालन करण्याच्या सूचना या पत्रात आहेत.

ट्विट

कोरोना व्हायरसची लक्षणे

COVID-19 ची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात आणि व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 2-14 दिवसांनी दिसू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चव किंवा वास कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये, विषाणूमुळे श्वसनाचे गंभीर आजार, निमोनिया आणि मृत्यू होऊ शकतो, विशेषत: वृद्धांमध्ये आणि वैद्यकीय उपचार प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्यांमध्येही ही लक्षणे आढळून येऊ शकतात.