Homemade Face Mask: घरच्या घरी फेस मास्क बनवणार असाल कोणत्या कपड्याचा वापर कराल? जाणून घ्या अधिक
Mask | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी WHO कडून काही गाइडलाइन्स जाहीर करत आवश्यकती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये मुख्य बाब म्हणजे मास्क लावणे. या गाइडलाइन्समध्ये असे ही म्हटले आहे की, कोरोना व्हायरस पासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर होममेड मास्कचा सुद्धा तुम्ही वापर करु शकतात. या गाइडलाइन्सनंतर होममेड मास्कचा वापर करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. तर जाणून घ्या होम मेड मास्क तुमच्यासाठी किती प्रभावी आहे.(COVID19 Spreads Through Houseflies? माशांंमुळे पसरतो का कोरोना व्हायरस, WHO ने दिलं हे स्पष्टीकरण)

होममेड मास्क संबंधित संशोधन केले जात आहे. त्यामधून हे माहिती करुन घेतल जातेय की, ज्यावेळी आपण शिंकतो किंवा खोकते तेव्हा होममेड मास्क कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करण्यास खरंच उपयोगी आहे का? यावर एका संशोधनातून असे समोर आले आहे की, मास्कसाठी 1 किंवा 2 लेअर्स असेल तर कोरोना व्हायरसपासून तुमचा बचाव होऊ शकतो. यासाठी टी-शर्टचा कापड सर्वाधिक उत्तम आहे.

जर्नल एक्सट्रीम मॅकेनिक्स मध्ये छापलेल्या एका शोधानुसार, जर होममेड मास्क दोन किंवा तीन लेअर्स पासून बनवला असल्यास कोरोनाचे संक्रमण होण्यापासून बचाव करु शकतात. पण एकच लेअर्स मास्कसाठी असल्यास ते प्रभावी ठरु शकत नाही. या संशोधनात असे ही म्हटले आहे की, बेडशीट्स, रजईचे कापड किंवा भांडी सुकवण्याचे कापड यांच्यावर ड्रॉपलेट परीक्षणाच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी होममेड मास्क किती फायदेशीर आहे त्याबद्दल ही पाहण्यात आले.(Coronavirus: चप्पल व बुटांमुळे होऊ शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग? जाणून घ्या काय सांगते WHO)

या बद्दल संशोधकर्त्यांनी असे म्हटले की, खरंतर एरोसोल हे पाच माइक्रोमीटर पेक्षा कमी वर्गीकृच केले जाते. तर हे शेकडो नॅनोमीटर पर्यंत पसरलेला असतो. तर तोंडातून किंवा नाकातून शिंकताना निघालेले मोठे थेंब निघाल्यास एका लेअर्सच्या मास्कसाठी फायदेशीर ठरु शकत नाही. तसेच शिंकताना किंवा खोकताना मोठे थेंब बाहेर पडत ते हवेत पसरले जातात. यासाठी 11 घरगुती कपड्यांचे परीक्षण केले गेले. त्यामध्ये एअरफ्लोचा दर मोजला गेला. ड्रॉप्लेट्स थांबवण्याची प्रक्रिया समजून घेणे थोडे कठीण होते. पण टी-शर्टचा कापड हा होममेड मास्क बनवण्यासाठी उपयुक्त असल्याचे समोर आले आहे. पण जर एखादा कापड एकदमच पातळ असेल तर त्याचा मास्क बनवणे टाळा.