Flies (PC - Pixabay)

How Does Coronavirus Spread? कोरोनाचा प्रसार कसा होतो या मुद्द्यावरुन आज वर म्हणजेच मागील सहा महिन्यात अनेक दावे, सवाल करण्यात आले होते. AC मधुन कोरोना पसरतो का, चप्पल बूट कोविड चा विषाणु घेऊन येऊ शकतात का, हे आणि असे अनेक प्रश्न आपल्यालाही पडले असतील, या सारख्याच एका बहुचर्चित प्रश्नावर आता जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर दिले आहे. अलिकडे घरात फिरणार्‍या माशांमुळे कोरोना पसरतो का हा प्रश्न अनेकांंकडुन केला जात होता, खरं पाहायला गेलं तर या शंंकेमागचं लॉजिक अगदी पटण्यासारखंं आहे. माशा (Houseflies) या बहुतांंश वेळा अस्वच्छ जागी जातात तिथुन जर का त्या आपल्या घरात येत असतील तर त्यांंना लागुन त्या ठिकाणचे विषाणु सुद्धा पसरुच शकतात,किंंबहुना अनेक रोग पसरण्यामागे या माशा कारण असल्याचे या आधीही दिसुन आले आहे. अशा वेळी भीती वाटणे साहजिक आहे. मात्र यावर WHO ने उत्तर देत अजुन तरी अशा प्रकारची कोणतीही घटना समोर आलेली नाही असे सांंगितले आहे.

मच्छर, डास चावल्याने कोरोना व्हायरस पसरतो का? जागतिक आरोग्य संघटनेने दिले 'हे' सोप्पे उत्तर

WHO ने सांंगितल्यानुसार कोरोनाचा विषाणु हा कोरोना झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातुनच पसरतो जेव्हा आपण बाधित व्यक्तीच्या संपर्कात येता तेव्हा तो व्यक्ती शिंंकला किंंवा खोकल्यास त्याच्या थुंकीमार्फत बाहेर पडणार्‍या विषाणुतुन कोरोना पसरु शकतो याच प्रमाणे जेव्हा आपण उघड्यावर असणार्‍या वस्तुंंना हात लावता आणि मग तेच हात नाकाला/तोंंडाला लावता तेव्हाही विषाणु पसरण्याची शक्यता असते. मात्र अन्य कुठल्याही माध्यमातुन विषाणु स्प्रेड होण्याची उदाहरणे अजुनतरी समोर आलेली नाहीत.

Glasses Protect Against COVID-19: चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका कमी? जाणून घ्या तज्ञांचे मत

दरम्यान कोरोना पासुन वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी मास्क आणि ग्लोव्ह्ज चा वापर, हाताचे निर्जंतुकीकरण, गरज नसल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे असे उपाय तुम्हीही करु शकता. या काळात कोणालाही प्रत्यक्ष स्पर्श करणे टाळावे असेही तज्ञ सांंगतात.