Mosquito (Photo Credits: Wikimedia Commons)
Dengue Safety Tips in Marathi: संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे. मात्र, शहरातील अनेक वस्त्यांमध्ये डेंग्यूसदृष्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या (Dengue) डासांमुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका  तसेच बांगलादेशात डेंग्यूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. फिलिपिन्समध्ये डेंग्यूची लागण झाल्याने 600 लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी लवकरात-लवकर उपाय शोधणे गरजेचे आहे. चला तर मग ‘या’ खास लेखातून डेंग्यूपासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावे आणि कोणते उपाय करू नये हे जाणून घेऊयात.

हेही वाचा - Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर

डेंग्यूपासून वाचण्यासाठी हे उपाय करा –

  • डेंग्यूपासून वाचण्यासाठी बाजारात मिळणारी मॉस्किटो रिपेलेंट वापरा.
  • तसेच दररोज फुल बाह्यांचा शर्ट आणि पाय झाकतील अशी पँट घाला.
  • घरातील सर्व खिडक्यांना तसेच दरवाजांना जाळी लावा. त्यामुळे डासांना घरात प्रवेश करता येणार नाही.
  • झोपतांना मच्छरदानीचा वापर करा.
  • तसेच आजारी पडण्याची लक्षणं दिसू लागली की, लगेच रुग्णालयात जाऊन उपचार घ्या.
  • शरीरातील इम्यून सिस्टिम वाढण्यासाठी योग्य आहार घ्या.

डेंग्यूपासून वाचण्यासाठी हे करू नका –

  • घरामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये जास्त दिवस पाणी साठवू नका.
  • तसेच ज्या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी साचले आहे, अशा ठिकाणी मुलांना खेळू देऊ नका.
  • डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला भेटायला गेल्यानंतर मास्कचा वापर करा. तसेच त्याला स्पर्श करणे टाळा.
  • घरातील कुलरची सफाई करून त्यात पाणी भरा.डेंग्यूपासून वाचण्यासाठी घरगुती उपाय -
  • कडुलिंबाचे तेल आणि नारळाचे तेल एकत्र करून त्यांचा वापर केल्यास डांसापासून आपला बचाव होऊ शकतो.
  • कापूर हे डासांना पळवण्यास मदत करते. एका बंद खोलीत कापूर जाळून ठेवा. असे केल्याने डास घरामध्ये येत नाही.
  • पुदीना, तुळशीची पाने, कडुलिंब, लिंबू, झेंडूची फुलं हे डासांना पळवण्यास फायदेशीर आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत संपूर्ण राज्यात 2 हजार 64 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हिवतापाचे 4 हजार 61 रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)