Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर
Mosquito (Photo Credits: (PixaBay)

पावसाळा (Monsoon) म्हणजे आजारांना आमंत्रण देण्याचा ऋतू असं म्हणायला काही हरकत नाही. पावसाळा सुरु झाला की डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria), कावीळ (Jaundice) यांसारखे आजार आपल्या भोवती घोंगावतात. अशा आजारांचे मूळ कारण असते ते साचलेले पाणी आणि डास. साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास जास्त होते. त्यामुळे पावसाळ्यात डासांचे प्रमाणही जास्त असते. अशा वेळी हे डास आपल्या घरापासून दूर राहावे आणि आपले संरक्षण होणे खूप गरजेचे आहे. आजार फैलावणा-या डासांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर तुम्ही कदाचित एखाद्या गंभीर आजाराच्या विळख्यात अडकू शकता.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मच्छरांपासून तुम्हाला आणि तुमच्या घराला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील अशी 5 झाडे सांगणार आहोत. ज्याने तुमचे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकता.

1. तुळस (Tulsi): 

हिंदू धर्मानुसार, तुळशीचे रोपांची पूजा केली जाते आणि यात बरेच औषधी गुणधर्म आहेत. मात्र तुम्हाला कदाचित माहित नसेल की हेच तुळशीचे रोप डेंग्यू-मलेरियाच्या मच्छरांना घरापासून लांब ठेवण्यासाठी मदत करतात. घराच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावल्यास डास घरापासून दूर राहतात.

2. झेंडू (Mexican Marigold):

पिवळ्या रंगाची झेंडूची फुले देवापुढे वाहिली जातात. झेंडूचे झाड घरात लावल्याने त्याचा वासाने डास, माश्या घरात शिरकाव करत नाही. पावसाळ्यात हे झाडं मॉस्किटो रिप्लीयंट चे काम करते.

3. लेवेंडर (Lavender):

जर तुम्ही तुमच्या घराच लेवेंडर चे रोप लावणार असाल, तर तुम्हाला डासांपासून बचाव करणारी लोशन त्वचेवर लावण्याची गरज नाही. लेवेंडरचे झाड हे डासांचे सर्वात मोठे शत्रू आहे. गरज असल्यास तुम्ही लेवेंडरचे तेल पाण्यात मिसळून त्वचेवर लावू शकता.

4. सायट्रोनेला गवत (Citronella):

पावसाळ्यात डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी सायट्रोनेला गवताचे रोप फायदेशीर ठरतील. हे झाड डेंग्यू, मलेरिया फैलावणा-या मच्छरांना दूर ठेवतात. त्याशिवाय यातून बाहेर पडणा-या सायट्रोनेला तेलाचा वापर मेणबत्ती, परफ्यूम, लॅम्प आणि हर्बल प्रोडक्ट्स बनवण्यासाठी केला जातो.

हेही वाचा- पावसाळ्यात घरात घोंगावणा-या माश्यांचा कसा कराल बंदोबस्त? जाणून घ्या 5 घरगुती उपाय

5. रोजमेरी (Rosemary)

रोजमेरी ची झाडे तुमच्या घरात लावल्यास तुमचा मच्छरांपासून बचाव होऊ शकतो. रोजमेरी ची फुले निळ्या रंगाची असतात. या झाडालाही डासांपासून बचाव करणारे गुणकारी झाडं म्हणून संबोधले जाते.

डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही केमिकल्सयुक्त लोशन त्वचेवर लावण्याची गरज नाही. ज्याने तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा या 5 झाडांपैकी तुम्हाल शक्य होतील ती झाडे घरात लावल्यास मच्छर तुमच्या घरापासून दूर राहतील.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)