श्रद्धा कपूरला डेंग्यू ; सायना नेहवाल बायोपिकच्या शूटिंगला ब्रेक
श्रद्धा कपूर (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या बायोपिकमधून रसिकांच्या भेटीला येणार होती. 'स्त्री' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले होते. पण श्रद्धा कपूरला डेंग्यू झाल्याने बायोपिकच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. श्रद्धाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब असल्याने काही तपासण्या करण्यात आल्या. त्यातून डेंग्यू असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही दिवसांची विश्रांती घेऊन ती पुन्हा सिनेमाच्या शूटिंगला हजर होईल. त्या दरम्यान दिग्दर्शन अमोल गुप्ते बायोपिकमध्ये सायना नेहवालचे बालपण साकारणाऱ्या लहान मुलीसोबतचे शूटिंग पूर्ण करत आहेत.

श्रद्धाच्या व्यस्त शेड्यूलमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या परिस्थितीत आम्ही तिच्या सोबत असल्याचे निर्माते भूषण कुमार यांनी सांगितले.