Dengue (PC - Pixabay)

Malaria And Dengue Cases In Mumbai: 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत शहरात मलेरियाचे (Malaria) सुमारे 756 तर डेंग्यूचे (Dengue) 703 रुग्ण आढळून आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यासंदर्भात माहिती दिली आहे. या आठवड्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. बीएमसीने याबाबत आरोग्य बुलेटिन जारी केलं आहे.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मलेरियासाठी सुमारे 83,342 रक्त स्लाइड्स गोळा करण्यात आल्या. 11,926 घरांची तपासणी करण्यात आली. तसेच 33,560 प्रजनन स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. याशिवाय नागरी अधिकाऱ्यांनी शहरात गेल्या 18 दिवसांत 1,270 अॅनोफिलीस डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून काढली. (हेही वाचा - Kerala Nipah Virus: केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढला, ऑस्ट्रेलियातून मागवले अँटीबॉडीचे डोस)

मलेरिया आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी करा 'हे' उपाय -

  • डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
  • डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कामाचे ठिकाण, निवासस्थान आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. डासांच्या अळ्या साठलेल्या पाण्यात तयार होतात. त्यामुळे घराजवळील थर्माकोलचे बॉक्स, टायर इत्यादी सारख्या वस्तू ठेवू नका.
  • ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या किंवा अतिसार असल्यास स्वत: चं औषधे घेऊ नका. अशावेळी तुमच्या जवळच्या BMC आरोग्य पोस्ट/दवाखाना/रुग्णालयाचा त्वरित सल्ला घ्या.
  • मलेरिया आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण उपचार घ्यावेत.

डेंग्यू आणि मलेरिया व्यतिरिक्त, या महिन्यात 18 सप्टेंबरपर्यंत मुंबईतील नागरी संस्थेने सात H1N1 प्रकरणे, 322 गॅस्ट्रो प्रकरणे, 50 लेप्टोस्पायरोसिस प्रकरणे आणि 19 चिकनगुनियाची प्रकरणे नोंदवली आहेत.