रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका अन्यथा तुम्हाला शांत झोप कधीही लागणार नाही 
रात्रीची शांत झोप photo credits: PIxabay

कामाचा दबाव, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक संकट  या आणि अशा काही समस्यांमुळे लोक वारंवार झोप न लागल्याची किंवा शांत झोप न येण्याची तक्रार करत असतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवतात.परंतु या कारणांव्यतिरिक्त, झोपेवर परिणाम करणारे आणखी एक महत्वाचे कारण आहे. आपल्याला कदाचित माहित नसेल परंतु तुम्हाला झोप न लागणे किंवा शांत झोप न लागणे हे बऱ्याचदा तुम्ही रात्री काय खाऊन झोपता यावर ही अवलंबून आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खर आहे. खाण्या-पिण्यासारख्या काही गोष्टींमुळे तुम्हाला चांगली झोप येते, तर अशाच काही गोष्टी रात्री खाल्ल्यामुळे तुमची झोप अस्वस्थ ही होऊ शकते. (Side Effects Of Raw Rice: तुम्हाला कच्चे तांदूळ खाण्याची सवय आहे? मग आताच व्हा सावध अन्यथा होऊ शकते मोठी समस्या )

आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रात्रीच्या खाणे टाळावे.

खूप मसालेदार अन्न

रात्री खूप मसालेदार अन्न खाणे योग्य नाही. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे जळजळ आणि गॅस होऊ शकतो. जे तुम्हाला चांगली झोप येऊ न देण्याचे कारण बनू शकते.

मांस किंवा जास्त प्रोटीन असलेले पदार्थ

मांसामध्ये चरबी आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. जे पचायला बराच काळ घेतात. अशा परिस्थितीत रात्री मांस खाल्ल्यामुळे तुम्हाला रात्रभर अस्वस्थता येते.

फळ

जर तुम्ही झोपायच्या आधी फळ खात असाल तर ते थांबवा कारण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते ज्याचे पचन होण्यास वेळ लागतो.आणि ते तुमच्या झोपवर परिणाम करू शकते.

जंक फूड

जंक फूडमध्ये उच्च प्रमाणात सैचुरेटेड फॅट असते. ज्याला पचण्यास बराच वेळ लागतो. रात्री जंक फूड खाऊन शांतपणे झोप लागणे हे थोडे अवघड समीकरण आहे.

आईस्क्रीम

बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाण्याची सवय असते किंवा रात्रीच्या वेळी भूक लागली की काही जण आईस्क्रीम खातात परंतु रात्री आईस्क्रीम खाणे खूप हानिकारक आहे.आईस्क्रीममध्ये फॅट्स आणि साखर दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खाल्ल्याने वजन तर वाढेलच मात्र त्याच्या परिणाम झोपेवरही होईल.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)