Photo Credit: Pixabay

Side Effects Of Raw Rice: अनेकांना चपातीच्या तुलनेत भात खायला आवडते. विशेषतः किनारपट्टी भागात राहणारे लोक भात खाणे पसंत करतात. डाळ, तांदूळ, खिचडी आणि पुलाव यासह तुम्ही आपल्या आहारात तांदूळ अनेक प्रकारे वापरता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो  की पांढर्‍या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.तांदूळ विविध जीवनसत्त्वे आणि खनिजेचा एक खजिना आहे. यात नियासिन, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फायबर, लोह, थायमिन आणि राईबोफ्लेविन भरपूर प्रमाणात आहे. दुसरीकडे तपकिरी तांदळामध्ये भरपूर प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की बर्‍याच लोकांना कच्चा तांदूळ खाण्याची सवय असते. कच्च्या तांदळाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ते खाल्ल्याने शरीराला गंभीर नुकसान होते. (Health Benefits Of Raw Onion: रोज कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास रहाल 'या' मोठ्या आजारांपासून दूर; जाणून घ्या फायदे )

कच्चा तांदूळ खाण्याचे तोटे

गैस्ट्रोइंटेस्टाइनल व पाचन संबंधी समस्या

कच्च्या तांदळामध्ये असे काही घटकआढळतात ज्यामुळे पचन संबंधित समस्या उद्भवतात. त्यामध्ये लेक्टिन नावाचे प्रोटीन आढळते. हे एक नैसर्गिक कीटकनाशक आणि विषाणूविरोधी म्हणून देखील कार्य करते. कच्चा तांदूळ खाल्ल्याने पाचन तंत्राशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मुतखडा समस्या

कच्चा भात खाणे मूत खडा असणाऱ्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. खरं तर, जे लोक कच्च्या तांदळाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात त्यांना मुतखड्याचा धोका जास्त असू शकतो.

फूड पॉइजनिंग ची समस्या 

कच्चा भात खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. कच्च्या भातमध्ये बॅसिलस सिरस नावाचे बॅक्टेरिया असतात ज्यामुळे शरीरात अन्न विषबाधा होण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून, कच्च्या भात खाणे टाळा.

ऊर्जा कमी होते

कच्चा भात खाल्ल्याने एखाद्याला सुस्तपणा जाणवू लागतो. कच्चा भात खाल्ल्याने शारीरिक थकवा येतो ज्यामुळे शरीराची उर्जा कमी होते. थकवा आल्यामुळे बर्‍याच प्रकारचे रोग देखील उद्भवू शकतात.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)