जगभरात अमेरिका, युके, बहरीन, चीन, रशिया मध्ये कोविड 19 वॅक्सिन देण्यास सुरूवात झाल्यानंतर आता भारतामध्ये देखील कोविड 19 लस आणि लसीकरणाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान आज (21 डिसेंबर) भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड 19 लस बाजारात आणण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि प्रभाव पडताळून पाहिला जाईल अशी माहिती दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतामध्ये जानेवारी 2021 ला कोणत्याही आठवड्यात लसीच्या आपत्कालीन वापराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. COVID-19 Vaccination in India Guidelines: भारतामध्ये कोरोना वायरस लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना मिळणार लस; गाईडलाईन्स जारी.
सध्या लसीकरणासाठी भारतात प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे आणि 50 वर्षावरील को मॉर्बिडीटी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. अंदाजे 1 कोटी लोक ही या प्राधान्यक्रमामध्ये आरोग्य कर्मचारी आहेत. त्यानंतर 2 कोटी हे पोलिस, स्वच्छता कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 50 वर्षावरील कर्मचारी असतील.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लसीची निर्मिती होत आहे सोबतीने लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात होणार असल्याने त्याबद्दल समज-गैरासमज, प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असतील त्याची जाणून घ्या काही उत्तरं!
- भारतामध्ये आता कोविड 19 वॅक्सिन कधी पण येऊ शकतं?
हो. भारतामध्ये लसीकरणासाठी आता कधीही मान्यता मिळू शकते. 3 लसींनी सरकारी यंत्रणांकडे अर्ज केला आहे. तर डॉ. हर्षावर्धन यांनी जानेवारी 2021 मध्ये लस येऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
- कोविड 19 लस भारतामध्ये सार्यांना समांतर पातळीवर दिली जाणार?
भारतामध्ये दिल्या सार्या सध्याच्या लसींची यादी पाहता ती 28 दिवसांच्या फरकाने आणि दोन शॉर्ट्समध्ये द्यायची आहे. त्यामुळे सुरूवातीला कोणत्या लसीचे किती डोस उपलब्ध आहेत त्यानुसार प्राधान्यक्रम लावला जाणार आहे. प्रथम आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे आणि वयोवृद्ध नंतर असा क्रम असेल असे सांगितले जात आहे.
- भारतामध्ये सार्यांना कोविड 19 लस घेणं बंधनकारक असेल?
भारतामध्ये कोविड 19 ची लस घेणं हे ऐच्छिक असणार आहे. जोर जबरदस्तीने ती दिली जाणार नाही. सरकार लसीकरणाबाबत नक्कीच सजगता निर्माण करणार आहे. लस घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होऊ शकते तसेच इतरांमध्ये तो फैलावण्याचा धोका कमी असल्याने लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
- कोविड 19 लस कमी वेळात उपलब्ध झाली आहे ती सुरक्षित आहे का?
भारत सरकार लसीकरणापूर्वी त्याची सुरक्षितता तपासूनच मग ती बाजारात उपलब्ध करणार आहे.
- कोविड 19 ची लागण झालेला किंवा संशयित रूग्ण लस घेऊ शकतो का?
कोविड 19 ची लागण झालेल्या व्यक्तीला कोविड 19 सेंटरपासून दूर ठेवले जाईल कारण त्याच्यामुळे इंफेक्शन अधिक पसरण्याचा धोका आहे. मात्र कोविड 19 ची लक्षणं गेल्यानंतर रूग्ण ठीक झाल्यानंतर त्याला लस दिली जाऊ शकते.
- कोविड 19 झालेली व्यक्ती लस घेऊ शकते का?
कोविड 19 ची लागण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात अॅन्टिबॉडीज असतात. पण त्या किती काळ टिकणार याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती सक्षम होईल.
- बाजारात अनेक कोविड 19 लसींच्या कंपनींमध्ये स्पर्धा सुरू आहे मग नेमकी लस कशी निवडतात?
भारतामध्ये कोविड 19 लसीला मान्यता देण्यापूर्वी त्याच्या मानवी चाचणीचा, प्री- क्लिनिकल डाटा तपासला जाणार आहे. या अहवालात सुरक्षिततेचा अंदाज असतो. त्यानंतर लस किती प्रभावी आहे आणि सुरक्षित किती आहे त्यानुसार लसीकरणासाठी मान्यता दिली जाते. भारतामध्ये एखाद्या भागात एकच लस वापरली जावी त्याचा टप्पा पूर्ण केला जावा अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान भारतामध्ये लसीकरणासाठी आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण ते अगदी लस साठवणूकीसाठी सार्या सोयी सुविधा याची चोख व्यवस्था केली आहे. राज्य स्तरावर देखील टास्क फोर्स नेमून केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने ही लसीकरण प्रक्रिया राबावणार आहेत.