Pfizer-BioNTech: फायजर-बायोटेक लस आपातकालीन वापरास मंजूरी, WHO च्या निर्णयामुळे Coronavirus Vaccine आयात, वितरणाचा मार्ग मोकळा
Coronavirus Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरातील नागरिकांना जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने खुशखबर दिली आहे. फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपातकालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांसमोर असलेला कोरोना व्हायरस लस (Coronavirus Vaccine) आयात, वितरणाचा प्रश्न सुटला आहे. फायजर-बायोटेक लस (Pfizer-BioNTech Vaccine ) वापरासाठी मान्यता देणारा इंग्लंड हा पहिला देश होता. या देशाने 8 डिसेंबर 2020 या दिवशीच ही मान्यता दिली होती. इंग्लंडपाठोपाठ अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही या कोरोना लसीच्या (COVID 19 Vaccine) आपातकालीन वापरास परवानगी दिली आहे.

कोरोना व्हायरस मानवास हानिकारक असल्याचे समोर आल्यापासून जगभरातील अनेक संशोधक, अभ्यासक यावर काम करत होते. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी अवघे जग जंग जगं पछाडत होते. परंतू, यश येत नव्हते. कोरोना व्हायरस आटोक्यात आण्याचे लस, औषध निर्मीती केल्याचे अनेक दावे प्रतिदावे केले जात होते. परंतू, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणालाच मान्यतमा मिळवता आली नव्हती. त्यामुळे दावा करण्यात आलेल्या लसींच्या वापराबाबत अधिकृतता नव्हती. आता फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपातकालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आणि एक मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे. (हेही वाचा, PM Modi on Coronavirus Vaccine: कोविड-19 वरील लस सर्व भारतीयांपर्यंत पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

दरम्यान, आपातकालीन वापरास का होईना मान्यता मिळवणारी फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) ही पहिली लस आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) ही पहिलीच लस ठरली आहे. जगभरातील नागरिकांना ही लस उपलब्ध व्हावी यासाठी एक पाऊल सकारात्मक दिशेने पडले आहे. या पावलाची वाट व्हावी आणि अवघे जग कोरोनामुक्त व्हावे, अशी भावना जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्राथमिकता असणाऱ्या नागरिकांपर्यंत ही लस सर्वात आधी पोहोचावी यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी असेही मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले आहे.