Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस, भारतातील औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरातील अनेक देशांसमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमधील वुहान (Wuhan) या शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर जगभरातील 30 देशांमध्ये हा विषाणू सापडला आहे. दरम्यान, या विषाणूमुळे मृत्य झालेल्या नागरिकांचा अधिकृत आणि अनधिकृत आकडा मोठ्या फरकाने दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मानवी आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांच्या भारतातील किमती वाढण्याची शक्यता आहे.

भारतात प्रतिजैवक निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या चीनमधून बल्क ड्रग्ज किंवा अॅक्टीव्ह फार्मास्युटिक्ल इंग्रीडिएंट्स (Active Pharmaceutical Ingredients) आयात करतात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये आगोदरच बल्क ड्रग्जच्या किमती वाढल्या आहेत. भारत काही प्रतिजैविक आणि जीवनसत्त्वे आदींवर निर्बंध घालू शकते. भारतात आवश्यक औषधांच्या उपलब्धता कायम ठेवण्यासाठी औषधनिर्माण विभाग (Department of Pharmaceuticals) उच्चस्तरीय पातळीवर विचार करत आहे. त्यामुळे मेट्रोनिडाजोल (Metronidazole) , क्लोरम्फेनिकोल (Chloramphenicol) आणि एजिथ्रोमाइसिन (Azithromycin) यांसारखी प्रतिजैवके तयार करण्यासाठी बल्क ड्रग्ज किंवा एपीआयची आवश्यकता असते.

चीनच्या वुहान प्रांतातून विटॅमीन बी 6 आयात केले जाते. या प्रांताचे राजधानीचे शहर वुहान येथूनच कोरोना व्हायरस इतर प्रदेशात पसरला. हुवान येथून भारतात बोरेक्स, क़पर, जिप्सम यांसारख्या मनरलची आयात भारत करतो. दरम्यान, अधिकारीक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही निर्यात आणी आयात याचे आकडे पाहात आहोत. चीनमध्ये लॉकडाउन अवधी वाढल्याचा उत्पादनांच्या वितरणावर अधिक भर पडू शकतो. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही औषधांची निर्यात थांबवू शकतो. ' इकोनॉमिक टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

चीनमध्ये लूनर न्यू इयरची सुट्टी वाढवून दिल्याने तेथून होणाऱ्या कच्चा मालाच्या आयातीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. भारतात बल्क ड्रग्ज किंवा एपीआय व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आताच किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. टॅबलेट, कॅप्सूल आणि सरम यांसारख्या गोष्टी फार्म्युलेशंस बनविण्यासाठी एपीपीआयचा कच्चा माल असतो. काही एपीआयच्या किमती 50 टक्क्यांपैक्षाही अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी औषध पुरवठा कमी प्रमाणात होत असून, तुटवडा जाणवू लागला आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)

दरम्यान, कोरोना व्हायरस जगभरातील अनेक देशांसमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. अद्यापही या रोगावर संपूर्ण उपचार करणारी लस उपलब्ध झाली नाही. नाही म्हणायला एका भारतीय संशोधकाने कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकेल अशी एक लस शोधल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची प्रथमिक चाचणीही यशस्वी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, असे असले तरी अद्यापही या आजारावर उपचार करु शकणारी लस उपलब्ध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही.