HIV and Covid 19 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जगभरात थैमान घालत असलेला कोविड 19 (Covid 19) या विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला? याबाबत जगभरात संशोधन सुरु आहे. दररोज नवनवे शोध, निष्कर्ष आणि सर्वेंचे अहवाल पुढे येत आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) किंवा कोविड 19 या विषाणूचा अधिक धोका हा एचआयव्ही (HIV) म्हणजेच ह्यूमन इम्युनोडेफिशिएन्शी व्हायरस (Human Immunodeficiency Virus), एड्स (AIDS) आजाराची लागण असलेल्या रुग्णांना असल्याचे पुढे आले आहे. पेंसिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी (Pennsylvania State University) मधील संशधकांनी केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. इतर रुग्णांच्या तुलनेत एचआयव्ही बाधित व्यक्तींमध्ये कोरोना संक्रमनाचे प्रमाण आणि धोका 24% अधिक आहे. तसेच, इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोना संक्रमित असलेल्या एचआयव्ही बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही 78% इतके आहे.

एचआयव्ही पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबत, मधुमेह, क्रोनिक प्रतिरोधी फुफ्फुसीय रोग आणि क्रोनिक किडनी आजाराने ग्रासीत रुग्णांचा अधिक समावेश आहे. एचआयव्ही, एड्सबाधीत व्यक्ती कोरोना विषाणूमुळे लगेच बाधीत होऊ शकतात. परंतू, हा धोका कमीही करता येऊ शकतो, असा संशोधकांचा अभ्यास सांगतो. त्यासाठी अँटीव्हायरल ड्रग्जपासून एस्ट्रोनॉफिर आणि प्रोटीज इनहिबिटर, एसएआरएस, कोविड संक्रमण धोका टाळण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. त्यामुळे एड्स रुग्णांचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट होऊ शकते. हा अभ्यास जर्नल सायंटीफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (हेही वाचा, World AIDS Day 2019: जागतिक AIDS दिनानिमित्त जाणून घ्या HIV बद्दलचे गैरसमज)

पेन स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ सायन्सेस च्या वर्नोन चिंचल्ली यांनी म्हटले आहे की, जेव्हापासून कोरोना महामारी सुरु झाली आहे, तेव्हापासू आम्ही एचआयव्ही, कोविड श्रेणीबद्ध करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ही माहिती सुरुवातीला अधिक प्रमाणात मिळवता आली नाही. कारण त्यावेळी माहिती मिळण्याचा अभाव होता. चिनचिल्ली यांनी पुढे म्हटले आहे की, पाठिमागील 22 अभ्यासांतील आकडेवारीचा अभ्यास केला. त्यात अमेरिका, अफ्रीका, यूरोप आणि अशियातील सुमारे 21 कोटी नागरिकांचा समावेश होता. यातून पुढे आले आहे की, एचआयव्ही-एड्स असलेल्या लोकांमध्ये कोविड संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

गेल्या एक वर्षभरातील अभ्यासातून पुढे आले आहे की, सध्यास्थितीत कर्करोग, मधुमेह आणि उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना संक्रमन आणि मृत्यूचा धोका अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात 38 कोटी लोक एचआयव्ही पॉझिटीव्ह आहेत.