प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो क्रेडिट: Pixbay)

World AIDS Day 2019: 1 डिसेंबर हा 'जागतिक एड्स दिन' (World AIDS Day 2019) म्हणून पाळला जातो. अद्याप आपल्या समाजात या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे या रुग्णांना अधिक मानसिक त्रास होतो. बऱ्याचदा लोक अशा रुग्णांसोबत बोलणंही टाळतात. समाजात या रोगाबद्दल जनजागृती झालेली नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने एड्सविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली. अनेकदा एखाद्या रुग्णाला एड्स झाल्यानंतर विविध अफवा पसरवल्या जातात. एड्स या रोगाविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. आज या लेखातून जागतिक एड्स दिनानिमित्त HIV बद्दलचे गैरसमज जाणून घेऊयात...(हेही वाचा - World AIDS Day 2019: जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घ्या कसा होतो हा आजार, याची लक्षणे आणि टाळण्याचे उपाय)

HIV बद्दलचे गैरसमज -

  • अनेकदा एड्स झालेल्या व्यक्तीला घरामध्ये वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही जर एखाद्या एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला किस केला तर एड्सचा विषाणू दुसऱ्या व्यक्तीकडे जातो असा गैरसमज आहे. परंतु, किस केल्याने एड्सची लागण होत नाही.
  • HIV बाधित रुग्णाने पिलेले पाणी पिल्याने एचआयव्ही संसर्ग होतो, असाही गैरसमज आहे. परंतु, HIV असलेल्या रुग्णाचे पाणी पिल्याने एड्स होत नाही.
  • HIV बाधित रुग्णासोबत राहिल्याने त्याला कोणताही संसर्ग होत नाही. तसेच HIV बाधित रुग्णाचा खोकला, शिंक किंवा थुंकीमुळे एड्स होत नाही.
  • तसेच एखाद्या HIV बाधित रुग्णाला चावलेला डास सामान्य व्यक्तीला चावला तर त्या व्यक्तीला एड्स होत नाही.
  • HIV बाधित रुग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कापड वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सर्व कारणांमुळे HIV ची लागण होत नाही.

    परंतु, AIDS ग्रस्त रुग्णाचे रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्याने तसेच दुषित रक्त असलेल्या सुई इंजेक्शनमधून HIV ची लागण होऊ शकते. HIV बाधित आईकडून स्तनपान करताना मुलाला होऊ शकतो. तसेच असुरक्षित लैंगिक संबंध न ठेवल्यास HIV चा धोका निर्माण होऊ शकतो.