World Press Freedom Day 2019: जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का करतात साजरा? जाणून घ्या महत्त्व
World Press Freedom Day 2019 Marathi | (File Image)

World Press Freedom Day 2019: जगभरामध्य प्रतिवर्षी 3 मे या दिवशी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) साजरा केला जातो. प्रत्यक वर्षी या दिवसाची संकल्पना वेगळी असते. संयुक्त राष्ट्र संघाने 3 मे हा दिवस World Press Freedom Day म्हणून साजरा केला जावा असे जाहीर केले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा केला जातो. पत्रकारिता, पत्रकारितेचे महत्त्व आणि त्याबाबतची जनमानसात जागृकता निर्माण करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. तसेच, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे याबाबत जगभरातील देशांतील प्रत्येक सरकारला आठवण करुन देणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजार करण्यामागे आहे. प्रसारमाध्यमांचे स्वतंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारने पत्रकारांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. सरकारला त्याबाबतची जाणीव करुन देणे हे हा दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

डिक्लेरेशन ऑफ विंडहोक

संपूर्ण जगामध्ये 1991 मध्ये पहिल्यांदा अफ्रीका देशातील पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली. त्यांनी 3 मे हा दिवस World Press Freedom Day (जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन ) म्हणून साजर साजरा केला जावा याबाबत जाहीर मागणी केली. ही मागणी डिक्लेरेशन ऑफ विंडहोक (Declaration of Windhoek) नावाने ओळखली गेली. या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने पहिल्यांदाच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे आयोजन केले. तव्हापासून 3 मे हा दिवस प्रतिवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन २०१९ संकल्पना

दरम्यान, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना प्रत्येक वर्षी नवनवी संकल्पना घेतली जाते. यंदा लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमं: फेक न्यूज आणि माहितीच्या प्रवाहात पत्रकारिता यासह निवडणुका.

इथोपिया देशात यूनेस्को द्वारा कार्यक्रम

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे यंदा 26 वे वर्ष आहे. यंदा या दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन हे इथोपिया देशाची राजधानी आदिस अबाब येथे करण्यात आले आहे. यूनेस्को आणि इथोपिया सरकार कार्यक्रम या कार्यक्रमासाठी योगदान देणार आहेत. निवडणुकांच्या काळात जगभरातील प्रसारमाध्यमांना अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. या अडचणी आणि आव्हानांवर प्रकाश टाकणे, शांतता आणि संमृद्धीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका आदी विषयांवर या कार्यक्रमात चर्चा केली जाणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Day 2019: महाराष्ट्र राज्याचा स्थापन दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन, या बद्दल थोडक्यात जाणून घ्या)

भारतातही विविध कार्यक्रमांचे आयोजन

दरम्यान, भारतात कोलकाता येथे भवानीपूर एज्युकेशन सोसाटी येथील पत्रकारीता आणि जनसंवादशास्त्र विभागात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात परिसंवाद, निबंध लेखन स्पर्धा यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

का साजरा केला जातो जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन ?

जगभरातील देश हे पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर अत्याचार करतात. प्रसारमाध्यमे जर सरकारच्या मर्जीनुसार चालत नसतील तर तो समूह आणि त्यातील व्यक्तींना विविध पद्धतीने अडचणींत आणले जाते. त्रास दिला जातो. त्यासाठी विविध आरोप, आर्थिक संकटात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. त्या समूहाची विश्वासार्हता संपवण्यासाठी विविध कारणांसाठी दंड, आयकर छापे, जाहिरातदारांवर अप्रत्यक्ष निर्बंध असे प्रकार अवलंबले जातात. तसेच, समुहाच्या संपादक, प्रकाशक आणि पत्रकारांना सतत भीती दाखवली जाते, धमक्या दिल्या जातात. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्व मार्ग कसे बंद होतील यासाठी गळचेपी केली जाते. हे प्रकार म्हणजे लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्याच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जगभरात जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जगभरात साजरा केला जातो.