World Breastfeeding Week 2021: जागतिक स्तनपान आठवडा हा प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट पासून एक आठवडाभर साजरा केला जातो. जागतिक स्तनपान आठवडा साजरा करण्याची सुरुवात ही स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगातील बालकांच्या आरोग्यामध्ये सुधार करण्यासाठी इनोसेंटी डिक्लेरेशन पासून झाली होती. ज्यावर ऑगस्ट 1990 मध्ये सरकारचे कायदे अधिकारी, डब्लूएचओ, युनिफेस आणि अन्य संघटनांनी स्तनपानाची रक्षा, प्रचार आणि समर्थन करण्यासाठी हस्ताक्षर केले होते. याच कारणास्तव जागतिक स्तनपान आठवडा साजरा केला जातो. तर जाणून घ्या जागतिक स्तनपानाचा इतिहास, थीम आणि त्यामागील महत्व.
1991 मध्ये ब्रेस्टफिडिंगला समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी 1990 ची घोषणेवर कार्य करण्यासाठी वर्ल्ड एलायंस फॉर ब्रेस्टफिडिंग अॅक्शनचे गठन करण्यात आले. सुरुवातीला ब्रेस्टफिडिंग वीक हा फक्त एकच दिवस साजरा करण्यात येईल असे ठरवण्यात आले होते. मात्र त्यानंतर तो जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. 1-7 ऑगस्ट दरम्यान ब्रेस्टफिडिंग वीक साजरा केला जात असून प्रथम तो 1992 रोजी पार पडला. आता तो 100 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जात आहे.
यंदाच्या ब्रेस्टफिडींगची थीम आहे की, Protect Breastfeeding: A Shared Responsibility. यामागील मुख्य कारण म्हणजे लोकांना स्तनपानाचे फायदे आणि त्याचे महत्व पटून देणे आहे.(देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महिलांच्या आरोग्यवर निगेटिव्ह परिणाम, अभ्यासातून समोर आली माहिती)
लहान मुलांना ब्रेस्टफिडिंग करमाऱ्या मातांच्या ब्रेस्ट मिल्क मध्ये अँन्टीबॉडीज असतात. ज्या व्हायरस आणि बॅक्टरियाशी लढण्यास मदत करतात. वर्ल्ड ब्रेस्टफिडिंग मध्ये लहान मुलांमध्ये अस्थमा आणि अॅलर्जीचा धोका सुद्धा कमी होतो. या व्यतिरिक्त ज्या लहान मुलांना सहा महिन्यापर्यंत आईचे दूधच दिले जाते. याबद्दल डॉक्टरांकडून सुद्धा ब्रेस्टफिडिंगसाठी सल्ला दिला जातो. डब्लूएचओनुसार स्तनपान फक्त मुलांसाठीच नव्हे तर मातांसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. कारण स्तनाचा कॅन्सरस डिम्बग्रंथिचा कॅन्सर, टाइप 2 मधुमेह आणि हृदयाच्या विकारापासून दूर ठेवण्यास मदत होते.