Honeybee (Photo Credits: Pixabay)

World Bee Day: मधमाशी (Honey bee) हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे. मधमाश्यांना हे इतरांसाठी मध बनवतात. थोडक्यात मधमाशी हा दुस-यांसाठी जगणारा किटक आहे. म्हणून अशा त्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार 20 मे हा दिवस 'जागतिक मधमाशी दिन' म्हणून घोषित करण्यात आला. या मधमाश्यांच्या अनेक प्रजाती आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांना माहित नसावीत.

म्हणूनच आज जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशींचे किती प्राकर आहेत याबाबत थोडी माहिती करून घ्या.

1. मिक्रॅपिस

एपिस फ्लोरिया आणि एपिस ॲंड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही.

2. मेगापिस

उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधूनमधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस मधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो. शुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या

3. एपिस मॅलिफेरा

एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली.

4. आफ्रिकन मधमाशी

आफ्रिकन मधमाश्या किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावत: या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत.

5. एपिस डॉर्साटा

आकाराने ही मधमाशी सर्वात मोठी आहे. दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये सर्वत्र पसरलेली आहे.

मधमाशांच्या असंख्य प्रजाती आहेत. मात्र प्रदूषणामुळे या प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत. त्यामुळे या मधमाशांचे संवर्धन कसे करता येईल याबाबत जरूर विचार केला पाहिजे.