मधुमाशीचा दंश (Honeybee) आणि त्याच्या वेदना ज्याने अनुभवल्या असतील त्यांनाच त्याचे गांभीर्य माहित असेल, सुज येणे, त्वचा लाल होणे, प्रचंड खाज आणि असहनीय वेदना देण्यासाठी केवळ एका मधुमाशीचा दंश देखील पुरेसा असतो. मात्र केरळ मधील एका व्यक्तीने एक नवे दोन नव्हे तर चक्क 60 हजार मधुमाश्या आपल्या चेहऱ्यावर चिकटवून त्यांना तब्बल 4 तास 10 मिनिटे 5 सेकेंद आपल्या त्वचेला झाकून राहू दिल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीच्या या हटके विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book Of World Records) मध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली आहे. हा रेकॉर्ड तसा तर 2 वर्षांपूर्वीचा आहे मात्र या रेकॉर्ड मेकिंगचा एक व्हिडीओ सध्या फेसबुक वर पाहायला मिळत आहे. कौतुकास्पद! बिहार येथील प्राणीप्रेमी अख्तर इमाम यांनी आपल्या दोन हत्तीच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, वाचा सविस्तर
केरळच्या 24 वर्षीय नेचर एम एस याने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. नेचर याचे वडील सजयकुमार हे एक पुरस्कार विजेते मधुमाशी पालक आहेत. त्यांच्या याच व्यवसायात नेचर सुद्धा लहानपणापासून रस घेत होता. सत्त्व वर्षाचा असल्यापासूनच नेचर आपल्या डोक्यावर मधुमाशी बनवून बिनधास्त फिरायचा. 24 व्या वर्षी त्याने हा रेकॉर्ड करायचे ठरवले. रेकॉर्डसाठी नेचर ने आपल्या पूर्ण डोक्यापासून ते मानेपर्यंत मधुमाश्या चिकटवल्या होत्या. या अवस्थेत चार तास १० मिनिट आणि पाच सेकेंद बसून त्याने हा रेकॉर्ड केला होता.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व्हिडीओ
या अनुभवाविषयी नेचर ने सांगितले की, मधुमाशा डोक्यावर ठेवणे हे सोप्पे नाही, त्यांना जर आपल्यामुळे काही त्रास झाला तर आपल्यावर सुद्धा त्या हल्ला करू शकतात. मात्र मला या मधुमाशांची सवय आहे. त्या माया बेस्ट फ्रेंड आहेत, त्यांना केवळ डोक्यावर चेहऱ्यावर ठेवून बसनेच नाही तर मी डान्स ही करू शकतो.