बिहार (Bihar) च्या पटना (Patna) येथील प्राणीप्रेमी अख्तर इमाम (Akhtar Imam) यांनी आपली संपूर्ण मालमत्ता मोती आणि राणी या दोन हत्तींच्या नावे केल्याचे समजत आहे. "प्राणी माणसांपेक्षा विश्वासू आहेत. मी हत्तींच्या संवर्धनासाठी बर्याच वर्षांपासून काम केले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझे हत्ती अनाथ झाले आहेत असं मला नको आहे असे सांगत इमाम यांनी आपले वारसदार म्हणून संपत्तीवर हत्तीचे नाव दिले आहे. मागील काही दिवसात केरळ (Kerala) मधील हत्तीणी ला फटाके चारून केलेली हत्या, औरंगाबाद (Aurangabad) मध्ये कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल्याचा प्रकार, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मध्ये स्फोटकांनी गायीचा जबडा उडवून लावल्याची घटना या प्राण्यांवरील अत्याचाराच्या (Animal Cruelty) घटना समोर येत असताना ही निश्चितच माणुसकीवर विश्वास ठेवायला लावणारी आणि कौतुकाची बाब म्हणता येईल. Pregnant Elephant Dies in Kerala: वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी भावूक मेसेज सह साकारलं सॅन्ड आर्ट!
प्राप्त माहितीनुसार, फुलवारी शरीफमधील जानीपूर येथील रहिवासी मोहम्मद अख्तर (वय 50) यांच्याकडे 20 आणि 15 वर्षे वय असणारे दोन हत्ती आहेत. मोती आणि राणी अशी त्यांची नावे आहेत. अख्तर म्हणतात की हत्ती त्याच्याकडे कौटुंबिक वारसा म्हणून आले आणि मोती आणि राणी त्या हत्तींची “मुले” आहेत. “मी 12 व्या वर्षापासूनच त्यांच्याबरोबर राहिलो आहे. ते दोघे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, यापैकी एका हत्तीने आपल्याला गुन्हेगारांपासून वाचवल्याचे सुद्धा खातर यांनी म्हंटले आहे. आपल्या मृत्यूपश्चात हे हत्ती अनाथ होऊ नये म्हणून त्यांच्या नावे साडेसहा एकर जमीन करत आहे. असे त्यांनी सांगितले आहे. अख्तर हे एशियन हत्ती पुनर्वसन आणि वन्यजीव ट्रस्ट (ऐरावत) या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुखही आहेत.
ANI ट्विट
Bihar: Akhtar Imam, an animal lover from Patna, gives his entire property to his two elephants Moti & Rani. He says, "Animals are faithful, unlike humans. I've worked for the conservation of elephants for many years. I don't want that after my death my elephants are orphaned". pic.twitter.com/W64jYsED33
— ANI (@ANI) June 10, 2020
दरम्यान अख्तर यांनी आपला हत्ती मोतीने आपला जीव कसा वाचवला याविषयी एक किस्सा IANS ला सांगितला आहे, “मोतीला सोबत घेऊन अख्तर एकदा भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर भागात गेले होते, जिथे तो आजारी पडला. त्याच्यावर तिथेच उपचार सुरु केले असताना आम्हाला तिथे काही दिवस थांबावे लागले. एक दिवस, मी तिथे झोपलेला असताना, मी मोतीच्या गर्जनाने उठलो तेव्हा एक माणूस बंदूक रोखून उभा होता, मोतीने गरजा देऊन सावध केल्याने माझा जीव वाचला असं अख्तर यांचे म्हणणे आहे.
एकीकडे अख्तर यांचे प्राणीप्रेमी हे कौतुकास्पद असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या बाबत त्यांनीच धक्कादायक खुलासा सुद्धा केला आहे. अख्तर यांच्या माहितीनुसार त्याच्याच कुटुंबातील काहींनी जनावरांच्या तस्करांशी हातमिळवणी केली होती आणि हत्तीला ठार मारून विकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे दोन्ही हत्ती अजूनही कुटुंबाला भितात. त्यामुळे आपल्या मृत्यू नंतर या दोन्ही प्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेत वन्य विभागाला त्यांची काळजी घेण्याचे पत्र लिहिले आहे.