केरळमध्ये फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्याने गर्भार हत्तीणीच्या मृत्यूने देशभरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियामध्येही सामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनी रोष व्यक्त करत संबंधित आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी आपलं दु:ख एका भावूक सॅन्डआर्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. ओडिशामध्ये पुरी समुद्रकिनारी गर्भार हत्तीणीसोबत झालेल्या अमानुष प्रकारानंतर आपला राग व्यक्त करताना त्यांनी 'माणूसकी संपल्याची' भावना एका मेसेजच्या माध्यमातून लिहली आहे.
सुदर्शन पटनायक यांनी हत्तीण आणि गर्भातलं बाळ साकारलं आहे. यासोबत त्यांनी "Mom! Couldn’t see the light & humanity." असा मेसेज त्यांनी लिहला आहे. 'आई मला प्रकाश आणि माणुसकी दिसत नाही' असा संदेश लिहित त्यांनी या घटनेवर आपल्या कलाकृतीमधून भाष्य केलं आहे. ट्वीटरच्या माध्यामातून हे आर्ट शेअर करताना भविष्यात केरळमध्ये झालेल्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. Pregnant Elephant Dies Update: पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक, वनमंत्री के राजू यांनी दिली माहिती.
सुदर्शन पटनायक यांचे सॅन्डआर्ट
“Mom! Couldn’t see the light & humanity.” I’m outraged by the unfortunate death of a pregnant elephant in Kerala. My #SandArt at #Puri beach. May such things never happen again. pic.twitter.com/WhtxZJC4rD
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) June 4, 2020
Kerala Elephant: केरळ हत्तणीला फटाक्याने भरलेले अननस दिल्या प्रकरणी एकाला अटक - Watch Video
आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत देखील त्यांनी खास वाळूशिल्प साकारलं आहे. दरम्यान काल मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या वृत्तानुसार, केरळमध्ये एप्रिल महिन्यात देखील अशाच प्रकारे आणखी एका हत्तीणीचा मृत्यू झाला आहे.