Pregnant Elephant Dies Update: पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक, वनमंत्री के राजू यांनी दिली माहिती
Pregnant Elephant Dies file image (Photo Credits: ANI)

उत्तर केरळ (Kerala) मध्ये पलक्कड गावात फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्याने गर्भवती हत्तीणीचा (Pregnant Elephant) झालेल्या मृत्यू संपूर्ण देश हळहळला. ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल होताच देशभरातून तीव्र पडसाद उमटू लागले. माणुसकीला कालीमा फासणारी अशी घटना मलप्पुरम जिल्ह्यातील पलक्कड (Palakkad) गावात घडली. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरांतून केली जात आहे. अशातच या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती केरळचे वनमंत्री के राजू (Forest Minister K Raju) यांनी दिली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत 25 मे रोजी जंगलातून जवळच्या खेड्यात आली. गर्भवती असल्याने, तिला आपल्या मुलासाठी काहीतरी खायला हवे होते. त्याच वेळी काही खोडकर लोकांनी तिला फटक्यांनी भरलेले अननस घायला दिले. ते खाताना तोंडातच त्याचा स्फोट झाला व हत्तीण जखमी झाली. तीन दिवस तशीच उभी होती, अखेर शनिवारी दोघांचाही मृत्यू झाला. Pregnant Elephant Dies After Eating Firecracker-Filled Pineapple: केरळ मधील गर्भार हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारकडून दखल; आरोपींना कडक शासन करणार- प्रकाश जावडेकर

देशभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले असून भारत सरकारनेही या घटनेची दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये अशाप्रकारे हत्तीणीचा मृत्यू होणं ही धक्कादायक बाब आहे. आपल्या भारताची ती संस्कृती नाही. आरोपींना कठोर कारवाई केली जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आहे.