Pregnant Elephant Dies After Eating Firecracker-Filled Pineapple: केरळ मधील गर्भार हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारकडून दखल; आरोपींना कडक शासन करणार- प्रकाश जावडेकर
Prakash Javdekar | Photo Credits: ANI/Twitter

केरळमध्ये गर्भार हत्तीणीला (Pregnant Elephant) फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्याने मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाली. हृद्य पिळवटून टाकणारा तो व्हिडिओ पाहून अनेकांचा राग अनावर झाला होता. आता भारत सरकारनेही या घटनेची दखल घेतली आहे. आज (4 जून) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये अशाप्रकारे हत्तीणीचा मृत्यू होणं ही धक्कादायक बाब आहे. आपल्या भारताची ती संस्कृती नाही. दरम्यान केरळच्या जंगलामध्ये सिनियर ऑफिसर्सची एक टीम तैनात करण्यात आली असून आरोपींना लवकरच पकडले जाईल. अशी माहिती देखील प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

अन्नाच्या शोधात आलेल्या गर्भार हत्तीणीला खोडकर लोकांनी फटक्यांनी भरलेले अननस घायला दिले. ते खाताना तोंडातच त्याचा स्फोट झाला व हत्तीण जखमी झाली. तिचा दात तुटला, जबड्यालाही मोठी इजा झाली. वेदना होत असलेली ती हत्तीण अशापरिस्थितीमध्येही शांतपणे वेलियार नदीमध्ये जाऊन उभी राहिली. आपल्या वेदना कमी करण्यासाठी ती पाणी पीत होती. या हत्तीणीबद्दल माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तिच्या बचावासाठी दाखल झाले, पण ती पाण्यातून बाहेर पडली नाही. ही हत्तीण सुमारे 20 तासांनंतर मुलाला जन्म देणार होती. तीन दिवस तशीच उभी होती, अखेर शनिवार (30 मे) दिवशी तिचा अंत झाला. ही घटना समोर येताच सामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीदेखील संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा: फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू; संतप्त शिखर धवन, हरभजन सिंहकडून दोषींना कठोर शिक्षेची मागणी)

ANI Tweet 

दरम्यान आज एनडीटीव्हीच्या वृत्तानुसआर, एप्रिल महिन्यात अशाप्रकारे एका तरूण हत्तीणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळचे स्थानिक प्रशासन देखील या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.