Pregnant Elephant Dies After Eating Firecracker-Filled Kerala's Pineapple (Photo Credits: ANI)

उत्तर केरळमधील (Kerala) मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. येथे काही लोकांनी गरोदर हत्तीणीला (Pregnant Elephant) फटक्यांनी भरलेले अननस (Pineapple) खायला दिले, ज्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली की तिला मृत्युच्या दाढेत उभे राहावे लागले. त्यानंतर ही हत्तीण कोणालाही इजा न करता शांतपणे पाण्यात जाऊन उभी राहिली, ही घटना गुरुवारी घडली. त्यानंतर शनिवारी या हत्तीणीचा गर्भातील बाळासह मृत्यू झाला. आता या घटनेबाबत वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एएनआय ट्वीट -

प्राणी लवकर मानवांवर विश्वास ठेवतात, परंतु काही वेळा मानव त्यांच्याबरोबर किती चुकीचा व्यवहार करतात हे पाहून आता, प्राण्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत 25 मे रोजी जंगलातून जवळच्या खेड्यात आली. गर्भवती असल्याने, तिला आपल्या मुलासाठी काहीतरी खायला हवे होते. त्याच वेळी काही खोडकर लोकांनी तिला फटक्यांनी भरलेले अननस घायला दिले. ते खाताना तोंडातच त्याचा स्फोट झाला व हत्तीण जखमी झाली.

तिचा दात तुटला, जबड्यालाही मोठी इजा झाली. वेदनांनी कळवणाऱ्या हत्तीणीला काही सुचेनासे झाले तेव्हा, ती कोणालाही इजा न करता शांतपणे वेलियार नदीमध्ये जाऊन उभी राहिली. आपल्या वेदना कमी करण्यासाठी ती संपूर्ण वेळ फक्त पाणीच पीत राहिली. या हत्तीणीबद्दल माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तिच्या बचावासाठी दाखल झाले, पण ती पाण्यातून बाहेर पडली नाही. ही हत्तीण सुमारे 20 तासांनंतर मुलाला जन्म देणार होती. तीन दिवस तशीच उभी होती, अखेर शनिवारी दोघांचाही मृत्यू झाला. (हेही वाचा: फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू; संतप्त शिखर धवन, हरभजन सिंहकडून दोषींना कठोर शिक्षेची मागणी)

ही घटना इतकी संतापजनक आहे की याब्दाल अनेकांनी सोशल मिडीयावर आपाल राग व्यक्त करत, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.