शुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मध हे नैसर्गिक आणि जुनी गोड गोष्ट आहे. तसेच मधाचे अनेक फायदे असून त्याच्या आरोग्यासाठी उत्तम असल्याचे मानले जाते. मधाचे नियमितपणे सेवन केल्याने शरिराला स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा मिळते. त्याचसोबत वजन कमी करण्यासाठी सुद्धा मधाचा वापर केला जातो. ऐवढेच नसून विविध पदार्थांत गोडवा आणण्यासाठी काही वेळेस मध उपयोगी पडते.

मधात अँन्टीबॅक्टेरियल आणि अँन्टी मायक्रोबियल गुण असतात. तसेच जखम, कापणे किंवा भाजलेल्या ठिकाणी ते लावल्यास फायदा होतो. परंतु सध्या बाजारात काही वेळेस शुद्ध मिळणे मुश्किल असते. त्यामुळे बऱ्याचवेळा ग्राहकांची मध खरेदी करताना फसवणुक होण्याची शक्यता असते. मात्र तुम्हाला जर शुद्ध मध ओळखाचे असल्यास 'या' सोप्या ट्रिक वापरुन त्याची पारख करु शकता.(अॅसिडीटी कडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, या उपायांनी दूर करा)

>शुद्ध मध ओळखण्यासाठी एक पाण्याने भरलेला ग्लास घेऊन त्यामध्ये मधाचे काही थेंब टाका. जर पाण्यात मधाचे थेंब विरघळ्यास ते भेसळयुक्त मध असते. परंतु शुद्ध मध हे पाण्यात टाकल्यास ते पाण्याच्या तळाशी जाऊन राहते.

> मधाचा एक थेंब बोटावर घ्या. जर मधाचा थेंब तुमच्या बोटावर परसला किंवा खाली पडल्यास ते भेसळयुक्त मत असते.

>मध शुद्ध आहे की नाही ओळण्यासाठी त्यामध्ये थोडे पाणी आणि व्हिनेगर टाका. मात्र जर मधामध्ये त्यावेळी काही बदल झाल्यास ते मध भेसळयुक्त मानावे.

>मधाची शुद्धता ओळखण्यासाठी प्रमुख त्याची चव महत्वाची असते. मात्र भेसळयुक्त मध खाताना घशाला खवखव किंवा थोडी जळजळ जाणवते.

एकाच वेळी अधिक मात्रेत मध सेवन करणे नुकसानदायक असते. तर दिवसातून दोन किंवा तीनदा एक चमचा मध घेणे योग्य ठरते. त्याचसोबत मधाला आयुर्वेदात अमृततुल्य मानले जाते.