Tulsi Vivah Mangalashtak and Aarti: तुळशीच्या लग्नाची आरती आणि मंगलाष्टकाच्या सुरात धुमधडाक्यात साजरा करा 'तुलसी विवाह सोहळा'!
यंदा तुमचा कार्तिकी द्वादशीचा मुहूर्त टळला असेल तर आज (10 नोव्हेंबर) तुम्ही तुलसी विवाह करू शकता. यंदा 12 नोव्हेंबरपर्यंत तुळशीची लग्न लागू शकता. पण ही तुळशीची लग्नं मंगलाष्टक शिवाय अपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये हिंदू पद्धतीनुसार लागणार्या प्रत्येक लग्नामध्ये विवाहाच्या प्रसंगी मंगलाष्टकं गायली जातात.
Tulsi Vivah Mangalashtak Lyrics: कार्तिकी एकादशीनंतर महाराष्ट्रामध्ये लग्नाची धामधूम सुरू होते. कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान तुलसी विवाह (Tulsi Vivah) सोहळा पार पडतो. यादरम्यान लक्ष्मीच्या रूपातील तुळशीचा भगवान विष्णू यांच्या रूपातील शाळीग्रामाचा विवाह पार पडतो. महाराष्ट्रात किशोरवयीन मुलाला देखील तुळशीच्या विवाहादरम्यान 'नवरदेवा'च्या रूपात उभं केलं जातं. त्यामुळे यंदा तुमचा कार्तिकी द्वादशीचा मुहूर्त टळला असेल तर आज (10 नोव्हेंबर) तुम्ही तुलसी विवाह करू शकता. यंदा 12 नोव्हेंबरपर्यंत तुळशीची लग्न लागू शकता. पण ही तुळशीची लग्नं मंगलाष्टक (Mangalashtak) शिवाय अपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये हिंदू पद्धतीनुसार लागणार्या प्रत्येक लग्नामध्ये विवाहाच्या प्रसंगी मंगलाष्टकं गायली जातात. Tulsi Vivah 2019: कार्तिकी द्वादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पहा यंदा तुलसी विवाह सोहळा साजरा करण्याचे मुहूर्त आणि पूजा विधी काय?
मंगलाष्टक म्हणजे वधू-वरांसाठी घरातील ज्येष्ठांनी आशीर्वादरूपी गायलेली आठ कडवी असतात. त्याच्या माध्यमातून उभयतांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने ही प्रार्थना लग्नाच्या मुहूर्तावर गायली जाते. हेही वाचा - Happy Tulsi Vivah 2019 Wishes: तुळशी विवाहाच्या मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन धुमधडाक्यात लावा तुळशीचे लग्न.
तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
तुलसी विवाह सोहळा पूजा आरती आणि मंगलाष्टकं
तुळशीची लग्न लावण्याची पारंपारीक प्रथा आहे. घरातील तरूणींना कृष्णाप्रमाणे पती मिळावा यासाठी तुळशीची लग्न लावण्याची प्रथा आहे. असेदेखील म्हटले जाते. तुळशीला नवरीप्रमाणे नटवून तुलसीचा विवाहसोहळा पार पडतो.
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2019 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

