Hindu Marriage Dates 2019-2020: तुलसी विवाह नंतर यंदाच्या लग्नसराईला होणार सुरूवात; पहा वर्षभरातील लग्न मुहूर्ताचे दिवस
Vivah Muhurat 2019-20 | Photo Credits: Pixabay.com

Shubh Vivah Muhurat: हिंदू धर्मीयांसाठी दिवाळी नंतर येणारा मोठा सण म्हणजे तुलसी विवाह सोहळा. कार्तिकी द्वादशी पासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह समारंभ पार पडतो. या सोहळ्याचं खास आकर्षण असतं ते म्हणजे लग्नाळू तरूण तरूणींना. कारण कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा विवाह मुहूर्तांना सुरूवात होते. त्यामुळे यंदा तुम्ही लग्नाचा बार उडवणार असाल तर पहा 2019-20 दरम्यान यंदा कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी आहेत लग्नाचे मुहूर्त?

'लग्न' या भारतीय संस्कृतीमधील एक मोठा सोहळा आहे. केवळ एका दिवसाचं हे सेलिब्रेशन नसून त्यामध्ये विविह संस्कारांचा, रीती-भातींचा समावेश आहे. त्यामुळे पंचांग पाहून विशिष्ट दिवसाची निवड केली जाते. लग्न हा आयुष्यातील टर्निंग पॉंईंट असल्याने केवळ नातं पुढे नेण्यासाठी नव्हे तर तो भावी आयुष्याच्या दृष्टीने एक मोठा बदल असतो त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना अनेकदा विचार केला जातो. Tulsi Vivah 2019: 'या' पारंपारिक मंगलाष्टकांच्या जयघोषात लावा यंदा तुळशीची लग्नं!

विवाहासाठी 2019 मधील महत्त्वाचे दिवस

नोव्हेंबर महिन्यातील लग्नाच्या तारखा: 8, 9, 10, 14, 22, 24, 30

डिसेंबर महिन्यातील लग्नाच्या तारखा: 5, 6, 11, 12

विवाहासाठी 2020 मधील महत्त्वाचे दिवस

जानेवारी महिन्यातील लग्नाच्या तारखा: 15, 16, 17, 18, 20, 29, 30, 31

फेब्रुवारी महिन्यातील लग्नाच्या तारखा: 3, 9, 10, 11, 2, 16, 18, 25, 26, 27

मार्च महिन्यातील लग्नाच्या तारखा: 2, 3, 4, 8, 11, 12

एप्रिल महिन्यातील लग्नाच्या तारखा: 14, 15, 25, 26

मे महिन्यातील लग्नाच्या तारखा: 2, 4, 5, 6, 8, 10, 12, 17, 18, 19, 23, 24

जून महिन्यातील लग्नाच्या तारखा: 8, 9, 13, 14, 15, 25, 26, 28

नोव्हेंबर महिन्यातील लग्नाच्या तारखा: 25, 30

डिसेंबर महिन्यातील लग्नाच्या तारखा: 1, 7, 8, 9, 11

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा हिंदू धर्मीयांच्या चातुर्मासाच्या काळात देव निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये लग्न विधी केले जात नाहीत. मात्र कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाचा बार उडवल्यानंतर आता देशभरात विवाह मुहूर्तांना सुरूवात होणार आहे.