
Happy Tulsi Vivah Marathi Wishes: तुळस (Tulsi) हे सर्वात पवित्र मानले जाणारे पान आहे. म्हणून कोणत्याही शुभकार्यात, धार्मिक विधीत तुळस ही आर्वजून वापरण्यात येते. असं म्हणतात की, तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते. अशा मंगलदायी समजले जाणा-या तुळशी विवाह सोहळा रंगणार आहे. कार्तिकी द्वादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची आख्यायिका आहे. यंदा तुळशी विवाह सोहळा 9 नोव्हेंबरला सुरू होणार असून 12 नोव्हेंबरला त्याची समाप्ती होणार आहे. या विवाहानिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली असून त्यासाठी एव्हाना आप्तलगांना आमंत्रणे देण्यासही सुरुवात झाली असेल.
या तुळशी विवाहानिमित्त आपल्या आप्तलगांना मराठमोठ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी कामी येतील खाली दिलेली ग्रीटिंग्स, मेसेजेस आणि Whatsapp Status.
ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

अंगणात उभारला विवाह मंडप
त्यात सजली ऊस आणि
झेंडूंच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज दिवस आहे खास
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

हेदेखील वाचा- Tulsi Vivah Special Rangoli 2019: यंदा तुळशी विवाहानिमित्त काढा ‘या’ विशेष रांगोळी डिझाईन्स (Watch Video)
सर्वात सुंदर तो नजारा असेल
जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल
प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल
जेव्हा तुळशीचा विवाह होईल
तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात. त्यामुळे अशा या तुळशीचे रोप ज्या घरात वास असतो, त्या घरात लक्ष्मी, सुख-शांती, समृद्धी गुण्यागोविंदाने नांदतात असे पुराणात सांगितले आहे.