Photo Credit: File Image

भारतात अनेक दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केले जाते.30 जानेवारी, 23 मार्च, 21 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर आणि 27 मे हे दिवस शहीद दिन म्हणून साजरे केले जातात.स्वातंत्र्य चळवळीत अनेक शूर पुत्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. दरवर्षी 23 मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.  23 मार्च हा तो दिवस आहे जेव्हा ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या फादर्शींना फाशी दिली होती. (World Water Day 2021: 'जागतिक जल दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या या मागील इतिहास आणि काही रोचक तथ्य )

शहीद दिनानिमित्त भारतीयांना अभिमान वाटतो

दरवर्षी 23 March मार्च रोजी शहीद दिन साजरा करून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहीली जाते.भगतसिंग यांनी वैचारिक क्रांतीच्या  मशाल पेटवली होती ,अजूनही बरीच तरूण त्यांच्या कार्याने प्रभावित होतात

शहीद दिवस इतिहास

भगतसिंग यांनी राजगुरू यांच्यासमवेत 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ब्रिटीश अधिकारी जे.जे. पी. सँडर्स यांना मारले. सुखदेव हेदेखील या योजनेत सामील होते.क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना या कृतीत मदत केली. याशिवाय ब्रिटिश सरकारला जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी क्रांतिकारक साथीदार बटुकेश्वर दत्त यांच्यासमवेत 8 एप्रिल 1929 रोजी इंग्रज सरकार ला जाग करण्यासाठी बॉम्ब आणि पत्रके फेकली. या घटनेनंतर दोघांना तिथे अटक करण्यात आली होती. (Chhatrapati Rajarshi Shahu महाराजांचा 137 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाला होता राजतिलक; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी)

तुरुंगात सुमारे २ वर्षांच्या काळात भगतसिंग क्रांतिकारक कारवायांशीही संबंधित होते आणि लेखन व त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला होता. असे म्हणतात की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी 24 मार्चच्या दिवशी निश्चित करण्यात आली होती, परंतु आदल्या दिवशी म्हणजेच 23 मार्चच्या रात्री या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली .आणि ही बातमी आगीसारखी सर्वत्र पसरली. जनतेचा संताप आणि निषेध पाहून ब्रिटीश सरकारने फाशी देण्याचा दिवस आणि वेळ बदलली आणि भारताच्या या क्रांतिकारांना एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली. असे  ही सांगितले जाते की फाशीवर जाताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आनंदाने - ''मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला' हे गाणे गात होते.