Rang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय?
Happy Rang Panchami (Photo Credits: File Photo)

फाल्गुन कृष्ण पौर्णिमेपासुन सुरू झालेला होलिकोत्सवाचा आनंद रंगपंचमी (Rang Panchami)  म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमीला संपतो. प्रामुख्याने कोळी बांधव आणि ग्रामीण भागामध्ये आजही पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होलिकादहनादिवशी होळी पेटवली जाते. पुढील चार दिवस धुळवड आणि पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. आज (25  मार्च) महाराष्ट्रासह देशात 'रंगपंचमी' साजरी केली जात आहे. Happy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

रंगपंचमीचं महत्त्व काय?

पुराणात सांगितलेल्या कथा आणि वैज्ञानिक कारणांनुसार होलिकादहन किंवा होळी सण हा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. पाच दिवस होळीचा अग्नी पेटता ठेवून वातावरणातील विनाशी गोष्टी, शक्तींचा नाश केला जातो. त्यानंतर सुरू झालेल्या नव्या युगाचं सेलिब्रेशन हे रंगांची उधळण करून केलं जातं.

पौराणिक कथांनुसार रंगांची उधळण करून देव देवतांना आकर्षित केलं जातं. त्रेतायुगात भगवान विष्णूंनी रंगांची उधळण केली होती. तर द्वापरयुगात गोकुळात बाळकृष्ण सवंगड्यांसह होळी खेळले होते. ते पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. वसंत ऋतूमध्ये वातावरणामध्ये उन्हाची काहिली वाढलेली असते. रंगांसोबत पाण्याची उधळण करुन तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या दिवशी सुरू आहे. प्रामुख्याने कोकणात हा सण अधिक उत्सहात साजरा केला जातो. होळीपासुन पुढे आठवडाभर शिमगोत्सवाची धूम असते. Holi 2019: होळीच्या रंगांचे डाग घरच्या घरी कपड्यावरून दूर करतील या '5' मॅजिकल टीप्स

रंगपंचमी दिवशी प्रामुख्याने अबीर आणि गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा तुम्ही रंगपंचमी दिवशी तुम्ही देखील रंगाची उधळण करणार असाल तर नैसर्गिक रंगाचा वापर करा म्हणजे तुमच्यासोबत पर्यावरणाचेही नुकसान कमी होण्यास मदत होईल.