Holi 2019: होळीच्या रंगांचे डाग घरच्या घरी कपड्यावरून दूर करतील या '5' मॅजिकल टीप्स
Holi Colours ( Photo Credits: Pixabay)

Holi Stains and Laundry Tips: होळी (Holi) हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. होळीच्या चार दिवसांमध्ये हमखास एकमेकांना रंगांनी माखवलं जातं. त्यामुळे बेसावधपणे येऊन कोणी रंग टाकल्यास तुमच्या त्वचेचं नुकसान होतंच पण त्यासोबतच तुमच्या आवडत्या कपड्याचंही नुकसान होऊ शकतं. कपड्यांवरील डाग काढण हे मोठं मुश्किलीचं काम असतं. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास तुम्हांला होळीच्या रंगांपासून कपडे सुरक्षित ठेवता येऊ शकतात. Holi 2019: केस आणि त्वचा यावरून होळीचे रंग सुरक्षितपणे काढल्यासाठी खास '9' टीप्स

कपड्यांवरून होळीच्या रंगाचे डाग कसे काढाल?

1. ब्लिच

पांढऱ्या कपड्यांवरून होळीच्या रंगाचे डाग काढायचे असतील तर ते गरम पाण्यामध्ये काही वेळ भिजत ठेवा. त्यामध्ये नॉन क्लोरीन ब्लिच मिसळा. कपडे धुवून वेगळे सुकवा. यामुळे रंग जाण्याचा, दुसऱ्या कपड्यांचा रंग लागण्याचा धोका कमी होतो.

2. व्हाईट व्हिनेगर

अर्धा कप व्हाईट व्हिनेगर १ टीस्पून डिटर्जंट मिसळा. त्यामध्ये सुमारे २ लीटर पाणी मिसळा. यामधील ऍसिड रंग काढायला मदत करतो.

3 .विंडो क्लिनर

अमोनिया बेस्ड स्प्रे किंवा विंडो क्लिनर डागांवर मारा. 15-20 मिनिटं कपडे तसेच ठेवा. त्यानंतर सध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुववावेत. यामुळे डाग जाण्यास मदत होईल.

4. लिंबाचा रस

लिंबामधील ऍसिडिक गुणधर्म डाग हटवायला मदत करतात. होळीच्या डागांवर 15 मिनिटं लिंबाचा रस लावून ठेवा. हळू हाताने घासल्यानांतर डाग हळूहळू निघून जाईल.

5. अल्कोहोल (Methylated spirits)

डायल्युट न केलेले (Methylated spirits) डागांवर टाका. त्यानंतर काही वेळाने कपडे हलकेच घासून धुतल्यास डाग जाण्यास मदत होते.

होळीचे डाग कपड्यांवरून जाण्यासाठी ते शक्य तितक्या लवकर स्वच्छ करणं आवश्यक आहे. सगळ्या कपड्यांवर हा उपाय करण्याआधी थोड्या भागावर टेस्ट करून बघा नंतरच पूर्ण कपड्यांवर वापरा. यामुळे कपड्यांचे नुकसान कमी होईल.

टीप - वरील सल्ले हे केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. यामुळे तुम्हांला अपेक्षित निकाल दिसेलच असे नाही. या उपायांच्या साकारामक निकालांचा आम्ही दावा करत नाही.