Shimga Festival 2019: कोकणातील होळी सण, पालखी नाचवणं, दशावतार यांनी आठवडाभर रंगतो शिमगोत्सव!
Shimga (Photo Credits: Instagram )

Shimga Celebration in konkan: होळीचा सण जसा देशात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो तसाच तो महाराष्ट्रामध्येही विविध स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणात होळी (Holi)  हा सण 'शिमगा'(Shimga) म्हणून ओळखला जातो. यंदा 20 मार्चला होलिका दहन (Holika Dahan) झाल्यानंतर होळीला सुरू होणार आहे. कोकणातील लोकांचा होळीचा सण 1-2 दिवसांचा नव्हे तर आठवडाभर चालणारा असतो. या शिमगोत्सवामध्ये होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, जळती लाकडं फेकण्याचा खेळ अनेक प्रकार पहायला मिळतात. Holi Special Trains: कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार 19 आणि 20 मार्चला 'पश्चिम रेल्वे'च्या होळी स्पेशल ट्रेन्स

कसा असतो कोकणातील होळीचा सण?

कोकणामध्ये मैदानात / सार्वजनिक ठिकाणी आंब्याच्या,ताड्याच्या झाडाची पानं, झावळ्या, सुक्या काड्या तोडून आणल्या जातात. माडाच्या आणो पोफळीच्या झाडाचे ओंडके एकत्र आणून होळी रचली आणि सजवली जाते. त्यावर फुलांचे तोरण बनवले जाते. सूर्यास्तानंतर संध्याकाळी फाल्गुन पौर्णिमेला ही होळी पेटवली जाते. त्याची विधीवत आणि गावकर्‍यांच्या मानाप्रमाणे पूजा होते. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. यावेळेस होळीभोवती फेर्‍‍या मारत बोंबा मारल्या जातात. होळीच्या निमित्ताने वातावरणातील आणि मनातील विनाशकारक विचार, दुर्गुण पेटून त्याचा नाश व्हावा ही धारणा असते.

पालखी नाचवणं

फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात कोकणातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी निघते. या पालखीमध्ये देवतेचे मुखवटे आणि प्रतिमा ठेवले जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोरून नाचवली जाते. सहाण म्हणजे गावाची चवडीची पण देव कार्याची जागा निवडली जाते. या ठिकाणी केवळ पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो.

 

View this post on Instagram

 

गाव : तांबेडी तालुका : संगमेश्वर #shimga #konkan

A post shared by Welcome To #Konkan_Tourisum (@yeva.konkan.aaploch.aasa) on

सांस्कृतिक सोहळा

तळ कोकण आणि गोवा या भागात प्रामुख्याने होळी म्हणजे शिमगोत्सवात सांस्कृतिक सोहळेदेखील रंगतात. दशावतार, संकासूर यांचं आगमन होतं. यामध्ये पुरूष मंडळी स्त्री वेष धारण करून कार्यक्रम सादर करतात. यासोबतच जाखाडी नृत्य सादर केलं जातं. खास मालवणी भाषेतील स्थानिक नाटकं सादर केली जातात.

कोकणातील काही भागात प्रामुख्याने होळीच्या रात्री जळती लाकडं फेकण्याचा एक खास साहसी खेळ रंगतो. होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी होळीची राख अंगाला लावून त्याने आंघोळ करण्याची प्रथा आहे. Happy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

कोकणातील रत्नागिरी, मालवण, तळ कोकण आणि गोवा भागामध्ये होळी 'शिमगा' म्हणून साजारा केला जातो. पण तुमच्या गाव काही हटके अंदाजात होळीचा सण साजरा करत असतील तर आम्हांला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा.