Holi Special Western Railway Trains for Konkan: होळीचा (Holi) दिवस हा कोकणवासीयांसाठी मोठ्या सणांपैकी एक आहे. गणपती आणि शिमग्याला चाकरमान्यांची पावलं आपोआपच आपल्या गावकडे फिरतात. कोकणात आरामदायी प्रवासाचा एक मार्ग म्हणजे रेल्वे, पण कोकणात जाणार्या गाड्यांचं (Konkan Railway) बुकिंग चार महिने आधीच हाऊसफुल्ल झाल्याने अनेक प्रवासांची गैरसोय. दरवर्षी होळी म्हणजेच 'शिमगा' (Shimaga) या सणाला जाणार्या कोकणवासीयांची संख्या पाहता यंदा रेल्वेने होळी स्पेशल विशेष गाड्यांची (Holi Special Trains) सोय केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेसोबतच आता पश्चिम मार्गावरही (Western Railway) खास ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेवर धावणार 'या' विशेष ट्रेन्स
पश्चिम मार्गावर कोकणवासीयांसाठी खास ट्रेन्स धावणार
पश्चिम मार्गावर वांद्रे ते मंगळूरू या मार्गावर होळी निमित्त दोन विशेष ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर या गाड्यांचं वेळापत्रक नक्की लक्षात ठेवा.
Running of Special Trains on Special Fare during Holi Festival 2019. #Holi2019 @RailMinIndia pic.twitter.com/49oSJWpPAP
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) March 12, 2019
होळीसाठी 19 आणि 20 मार्च 2019 दिवशी खास ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. या ट्रेन्स बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, मडगाव, कारगाव, कुमटा, भटकळ, मुंकाबिका रोड बायंदूर , इत्यादी ठिकाणी थांबणार आहे. कोकणात जाण्यासाठी ट्रेनसोबतच होळी 2019 साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी MSRTC कडून विशेष एसटी बसेसची सोय
कोकणामध्ये होळीचा सण म्हणजे शिमगा आठवडाभर साजरा केला जातो. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच स्थानिक देवतांच्या पालखा नाचवणं हा सोहळा पाहण्यासारखा असतो.