Mahashivratri and Holi 2019 Special Trains on Konkan Railway: शिमगा (Shimga) हा कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यामुळे यंदा 4 मार्चला महाशिवरात्र (Mahashivratra 2019) आणि 20 मार्च दिवशी होळी (Holi 2019) असल्याने प्रवाशी मोठ्या संख्येने कोकणाकडे जातात. प्रवाशांची गर्दी पाहता या दोन सणांसाठी मध्य रेल्वे कोकण मार्गावर 10 विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, सावंतवाडी रोड, करमाळी, पनवेल, पुणे या स्थानकांवरून विशेष गाड्या धावतील. या महाशिवरात्र (Mahashivratri) आणि होळी 2019 (Holi) विशेष गाड्याचं बुकिंग 26 फेब्रुवारी 2019 पासून सुरु होणार आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मुंबई, पुणे येथील भाविकांसाठी मध्य रेल्वे चालवणार 10 विशेष ट्रेन्स, 16 फेब्रुवारीपासून बुकिंग होणार सुरू
महाशिवरात्र 2019 विशेष ट्रेन्स
महाशिवरात्र विशेष गाडी 2-4 फेब्रुवारी चालवल्या जातील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सावंतवाडी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सावंतवाडी रोड आणि करमाळी पनवेल दरम्यान सहा विशेष गाड्या धावतील.
Running of Special Trains During Mahashivaratri / Holi Festival on Konkan Railway route. @RailMinIndia pic.twitter.com/iO62pclQLU
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) February 23, 2019
होळी 2019 विशेष ट्रेन्स
होळीमध्ये पुणे - सावंतवाडी आणि सावंतवाडी रोड ते पनवेल अशा विशेष चार ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. 19-21 फेब्रुवारी दरम्यान या विशेष ट्रेन्स चालवल्या जातील.
रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरु करण्यात येईल. तसेच विशेष गाड्यांमध्ये काही अनारक्षित डब्यांचे बुकिंग युटीएस ऍपच्या माध्यमातूनही केले जाणार आहे. त्यामुळे यंदा शिमग्यासाठी कोकणात रेल्वेने जाण्याच्या विचारात असाल तर वेळीच बुकिंग करायला विसरू नका.