Passport | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीयांचा परदेश प्रवास आता सुकर करण्यासाठी सरकारकडून ई पासपोर्ट (e-passport) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या ई पासपोर्ट मध्ये विमानतळांवर इमिग्रेशनसाठी लागणारा प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रवासांच्या पासपोर्ट मधील चीप automated ID तपासू शकणार आहेत. Passport Seva Program (PSP) 2.0 अंतर्गत डिजिटल अपग्रेड च्या माध्यमातून अअता देशात 1 एप्रिल पासून ई पासपोर्टची सेवा दिली जात आहे. सुरवातीला ही सेवा पायलट फेझ मध्ये होती.

भारतामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, सिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चैन्नई, हैदराबाद, सुरत, रांची मध्ये ई पासपोर्ट देण्यास सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा देशभर उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आता जाणून घ्या ई पासपोर्ट काय आहे? तो कुणाला, कसा मिळणार?

e-passport म्हणजे काय?

ई-पासपोर्ट हा एक नियमित पासपोर्ट आहे ज्यामध्ये आता डिजिटल फीचर्स वाढवण्यात आले आहेत. ई पासपोर्ट मध्ये एक लहान चिप असते, ज्याला RFID चिप म्हणतात आणि कव्हरच्या आत एक अँटेना असतो. ही चिप फिंगरप्रिंट्स आणि चेहऱ्याच्या तपशीलांसारखी वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती साठवते. समोरच्या कव्हरवर एक लहान सोन्याचे चिन्ह त्याला ई-पासपोर्ट म्हणून मार्क करते.

भारत सरकारने वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि पासपोर्ट रेकॉर्डची डुप्लिकेशन रोखण्यासाठी ई-पासपोर्ट सुरू केला आहे.

ई पासपोर्टचा फायदा काय?

ई पासपोर्ट मुळे पासपोर्ट फसवणुकीपासून संरक्षण करता येणार आहे. RFID चिपमुळे बनावट किंवा डुप्लिकेट पासपोर्ट तयार करणे कठीण होते. तसेच सीमा तपासणीवर प्रवाशाची ओळख पडताळणे सोपे आणि जलद होते, त्यामुळे वेळ वाचणार आहे.

सध्या वैध पासपोर्ट असणार्‍यांना ई पासपोर्ट बदलून घ्यावा लागणार का?

नाही. जर तुमच्याकडे वैध पासपोर्ट आहे तर तातडीने ई पासपोर्ट करून घेणं बंधनकारक नाही. त्या पासपोर्टची वैधता संपेपर्यंत तो वापरता येऊ शकतो. ई-पासपोर्टमुळे भारतीय नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे.

e-passports साठी online कसा कराल अर्ज?

  • Passport Seva Online Portal वर रजिस्टर करा.
  • रजिस्टर आयडी वापरून लॉगिन करा.
  • “Apply for Fresh Passport/Re-issue of Passport.” वर क्लिक करा. जर तुम्ही अशा पासपोर्ट प्रकारासाठी अर्ज करत असाल जो तुम्ही यापूर्वी कधीही ठेवला नसेल तर “Fresh” निवडा किंवा जर तुम्ही पूर्वी त्याच प्रकारचा पासपोर्ट ठेवला असेल तर “Reissue” निवडा.
  • ऑनलाईन फी भरून अपॉईंटमेंट बूक करा.
  • तुमच्या अपॉइंटमेंट दरम्यान तुमची अर्ज पावती प्रिंट करा किंवा सेव्ह करा किंवा फक्त एसएमएस कन्फर्मेशन दाखवा.
  • नियोजित तारखेला मूळ कागदपत्रांसह तुमच्या निवडलेल्या PSK किंवा RPO ला भेट द्या.

सध्या ई पासपोर्ट देशात निवडक पासपोर्ट केंद्रांवरच उपलब्ध आहेत. त्यामुळे ई पासपोर्ट हवा असल्यास त्याच केंद्रांची निवड करा.