ST Bus (Photo Credits: Twitter)

होळीसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने होळीनिमित्त विशेष बसेसची सोय केली आहे. 17 ते 24 मार्च या कालवधीत मुंबईतून कोकणासाठी विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई आणि कोकणातील विविध बस स्थानकातून ही जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. होळी 2019 साठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर! 10 विशेष ट्रेन्सची सोय

कोकणात गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांचे विशेष आकर्षण असते. त्यानिमित्ताने अनेक कोकणवासी गावाकडे जातात. त्यांच्यासाठी बसेसची ही सोय फारच फायदेशीर ठरणार आहे.

17 मार्चपासून मुंबई सेंट्रल, परळ, नेहरुनगर, कुर्ला या बस स्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येतील. या व्यतिरिक्त प्रवाशांच्या सोयीसाठी 100% ग्रुप बुकींगच्या बसेस इच्छित स्थळापासून सोडण्यात येणार आहेत. आरक्षण बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील. Indigo Holi Sale: देशांतर्गत विमानप्रवास 899 रुपयांत तर आंतरराष्ट्रीय तिकीट 3,399 रुपयांपासून उपलब्ध

या बसेसचे बुकींग सुरु झाले असून तुम्ही public.msrtcorg.com या संकेत स्थळावरुन आणि Mobile Reservation अॅपद्वारे बुक करु शकता.